भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वेगाने प्रसार होत आहे. प्रत्येक महिन्यात जवळपास 1 लाख इलेक्ट्रिक स्कूटर अण मोटरसायकल भारतात विकल्या जातात, टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर कोणत्या, याविषयी आपल्याला उत्सुकता असते, तसेच काही महत्वपूर्ण निकषावर ह्यात त्यांची विक्री हि खाली वर होत असतात.

वाढत्या पेट्रोल च्या किंमती, सरकारच्या प्रोत्साहन योजनांचा जसे सबसिडी चा आधार, आणि ग्राहकांची पर्यावरणपूरक पर्यायांकडे वाढती ओढ यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, फेब्रुवारी 2025 मध्ये भारतात सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर कोणत्या होत्या, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, आणि बाजारात कोणते नवीन बदल दिसत आहेत आपण या पुढे जाणून घेणार आहोत.
फेब्रुवारी 2025 मधील टॉप 5 सर्वाधिक विक्री झालेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स
5️⃣ ग्रीव्ह्स अॅम्पिअर
ग्रीव्ह्स हि भारतातील एक महत्वपूर्ण ओळख असलेली कंपनी आहे. ग्रीव्ह्स अॅम्पिअर ची Nexus हि सुंदर दमदार व एक उत्कृष्ठ इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ग्रीव्ह्स अॅम्पिअर ने या फेबुवारी मध्ये टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये स्थान मिळवले आहे, ग्रामीण आणि निमशहरी भागात ग्रीव्ह्स अॅम्पिअरच्या स्कूटर्सला मोठी मागणी आहे.
ग्रीव्ह्स अॅम्पिअर ने फेबुवारी मध्ये 3700 यूनिट विक्री केले, या मध्ये 2% ची वाढ झाली आहे. 5 वे स्थान घेऊन 5% मार्केट शेअर आहे.
प्रमुख मॉडेल्स– Ampere Nexus, Magnus, Primus,
बॅटरी – 3 kWh
रेंज – 100 किमी प्रति चार्ज
स्पेशल फीचर्स – हलके वजन, स्वस्त मेंटेनन्स, लांब टिकणारी बॅटरी व टच स्क्रीन 7 इंच डिस्प्ले.
4️⃣ ओला इलेक्ट्रिक
ओला इलेक्ट्रिक हि भारतात इलेक्ट्रिक स्कूटर चे मार्केट वाढवण्यात एक महत्वाची कंपनी आहे, ओला च्या स्कूटर ह्या सर्वपरिचित आहेत व मागच्या महिन्यापर्यंत नंबर 1 ची इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी होती, ह्यांच्या स्कूटर पैकी S1 Pro ग्राहकांसाठी आकर्षक आणि दमदार पर्याय आहे, मात्र फेबुवारी मध्ये ओला च्या विक्रीत मोठी घट दिसून आली परंतु टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये ओला हि टिकून आहे.
ओला इलेक्ट्रिक ने फेबुवारी मध्ये 8647 यूनिट विक्री केले, या मध्ये त्यांनी -65% घट नोंदवली जी जानेवारी मध्ये 24370 यूनिट विक्री सह 1 नंबर वर होती. ओला इलेक्ट्रिक ने टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर 4 थे स्थान मिळवले आहे व ओला चा मार्केट शेअर हा 11% आहे
- प्रमुख मॉडेल्स– S1 Air, S1 X, S1 Pro gen 2/3, Rodster, Rodster Plus.
- बॅटरी – 4 kWh
- रेंज – 140/251/320 किमी प्रति चार्ज
- स्पेशल फीचर्स – क्रूझ कंट्रोल, मूड लाइटिंग, अॅडव्हान्स कनेक्टिव्हिटी, 7-इंच टचस्क्रीन
3️⃣ एथर एनर्जी
एथर 450X त्याच्या स्पोर्टी लुक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लोकप्रिय ठरली आहे. तसेच रिझ्टा हि फॅमिली स्कूटर हि भारतीय मार्केट मध्ये आपली वेगळी ओळख बनऊन आहे. एथर ने टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 3 रे स्थान मिळवले आहे.
एथर एनर्जी ने फेबुवारी मध्ये 11788 यूनिट विक्री केले, या मध्ये त्यांनी 10 % ची वाढ नोंदवली आहे. व या टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 15% मार्केट शेअर ठेवू आहे. या विक्री मध्ये जास्त प्रमाणात रिझटा चा हिस्सा असावा.
- प्रमुख मॉडेल्स– 450X Gen 3, 450S व Rizta.
- बॅटरी – 3.7 kWh
- रेंज– 146/ 156 किमी प्रति चार्ज
- स्पेशल फीचर्स – टचस्क्रीन डॅशबोर्ड, ओटीए अपडेट्स, वेगवान चार्जिंग, ट्रॅक्शन कंट्रोल, 0-40 किमी/तास फक्त 3.3 सेकंदात
Read Our Post – Ather Rizta Family Scooter
2️⃣ टीव्हीएस इलेक्ट्रिक
टीव्हीएस iQube भारतीय ग्राहकांसाठी एक परवडणारा आणि टिकाऊ पर्याय आहे, हि जुनी कंपनी अस्लयामुळे ह्यांच्यावर एक विश्वास तयार झाला आहे, टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 2 स्थान मिळून हि टी वी एस ने मात्र फेब्रुवारीत विक्रीत घट नोंदवली आहे.
टीव्हीएस iQube फेबुवारी मध्ये 18746 यूनिट विक्री केले, यामध्ये त्यांनी 22% ची घट नोंदवली आहे. व टीव्हीएस चा मार्केट शेअर 24% राहिला आहे. विशेष म्हणजे टी व्ही एस हि ह्या कालावधीत साइलेन्ट गेम चेंजर ठरली आहे.
- प्रमुख मॉडेल्स – iQube स्टँडर्ड, iQube S, iQube ST
- बॅटरी -2.2/ 3.04 व 5.1 kWh
- रेंज – 100-145 किमी प्रति चार्ज
- स्पेशल फीचर्स – TFT डिस्प्ले, स्मार्ट कनेक्टिव्हिटी, वेगवान चार्जिंग, गूगल असिस्टंट इंटिग्रेशन
1️⃣ बजाज चेतक
फेबुवारी मध्ये बजाज चेतक ने पुन्हा एकदा बाजारपेठेत वर्चस्व गाजवले आहे. याच्या क्लासिक लुक आणि प्रीमियम फीचर्स व मजबूत बिल्ट क्वालिटी मुळे ग्राहकांचा या स्कूटर कडे मोठा ओढा आहे. बजाज चेतक ने ह्या महिन्यात टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये नंबर 1 च स्थान मिळवले आहे.
बजाज चेतक चे फेबुवारी मध्ये 21335 यूनिट विक्री केले, या मध्ये त्यांनी 1% ची वाढ नोंदवली आहे. व बजाज चेतक चा मार्केट शेअर हा 28% राहीला आहे.
- प्रमुख मॉडेल्स – 2901/3501 चेतक प्रीमियम, 2902/2903/3502/3503 चेतक अर्बन
- बॅटरी – 2.88/3.5 kWh लिथियम-आयन
- रेंज – 108/ 123/153 किमी प्रति चार्ज
- स्पेशल फीचर्स – मेटल बॉडी, डिजिटल कन्सोल, IP67 वॉटरप्रूफिंग, अॅप कनेक्टिव्हिटी
मार्केट सेंटिमेंट
- बजाज चेतक आणि एथर रिझटा यांची विक्री वाढली आहे, कारण ग्राहक प्रीमियम फीचर्स आणि मजबूत बिल्ड क्वालिटीला प्राधान्य देत आहेत. तसेच ओला च्या कु प्रसिद्धी मुळे ओला ला फटका बसल्याची शक्यता असावी.
- टीव्हीएस आणि ओला इलेक्ट्रिक यांची विक्री कमी झाली आहे, जी नवीन मॉडेल्सच्या प्रतीक्षेमुळे असू शकते. कारण ओला ने आताच त्यांच्या जेनरेशन 3 ची बूकिंग चालू केली आहे. तसेच ओला ने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार त्यांनी हि 20 हजार प्लस गाड्या विकल्या परंतु त्यांचा रेजिस्ट्रेशन वेंडेर बदलल्या मुळे त्या पोर्टल वर डिस्प्ले होत नासाव्यात.
- ग्रीव्ह्स अॅम्पिअर हा ब्रँड स्वस्त आणि विश्वासार्ह स्कूटर्ससाठी प्रसिद्ध आहे, विशेषतः लहान शहरांमध्ये व गाव खेड्यांमध्ये परिचित हि आहे.
- सरकारच्या अनुदान योजनांमध्ये बदल झाल्यामुळे काही ब्रँडच्या विक्रीवर परिणाम झाला असावा.
- EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर विकसित होत असल्यामुळे जास्त लोक इलेक्ट्रिक स्कूटर्स स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. काही ब्रँड्सने मजबूत कामगिरी केली, तर काहींना विक्रीत घट झाली. तुमच्या मते सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक स्कूटर कोणती? तुम्ही कोणते मॉडेल वापरत आहात किंवा खरेदी करण्याचा विचार करत आहात? कमेंट करा आणि तुमचे मत सांगा.