Kubota U17 Mini Excavator जगातील सर्वात छोट पोकलेन

Kubota U17 Mini Excavator हे जगातील सर्वात छोटे पोकलेन आहे जे फक्त 1800 किलो वजन व 3 फुट रुंद आहे. जे की कितीही अरुंद जागेत काम करण्यास सक्षम ठरते. कमीत कमी उत्पादन खर्च हि त्याची जमेची बाजू म्हणता येईल. हे मशीन कुठल्या हि मशीनला नाही तर माणसाला रिपलेस करते. 15 ते 20 माणसानंकर्वी करण्यात येणाऱ्या कामाची हे मशीन बरोबरी करते.

Kubota U17 Mini चे वैशिष्ठे

छोटी पोकलेन हि अतिशय अडचणीच्या ठिकाणी काम करण्यात खुप उपयोगी असतात. Kubota U17 Mini Excavator हे 1.8 टन वजन आहे, पाइपलाइन असो वा खोदकाम ह्या मध्ये जवळपास तासाला 15 ते 20 माणसं करणारे काम हे मशीन करते, म्हणजेच 15 मॅन हवर्स चे वर्क हे करण्यास सक्षम आहे. ब्रेकर हि जोडता येते त्यामुळे अरुंद गल्ली असो वा एखादी फॅक्टरी त्यामद्धे हि काम करता येते.

मध्य प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये तर हे मशीन विहीर खोदकाम करण्यास अतिशय उपयोगी ठरत आहे. व प्रसिद्ध हि झाले आहे.

Kubota U17 Mini Excavator
Kubota U17 Mini Excavator Image Credit Escort Kubota
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Kubota U17 Mini इंजिन

Kubota ने ह्या मशीन मध्ये Kubota निर्मित जपानी इंजिन दिलेले आहे. जे 16 HP 9.6kW(13PS)/2,300rpm क्षमते चे आहे व अतिशय कमी आवाज व कंपन हि ह्या इंजिन ची वैशिष्ठे म्हणता येईल. Kubota U17 Mini Excavator ला हे इंजिन सुपर मशीन बनवते. ब्रेकर व आउगर सारख्या अटचमेन्ट ला सुद्धा सुइटेबल आहे.

Kubota U17 Mini हायड्रोलिक्स

Kubota ने या मध्ये H M S हायड्रोलिक्स सिस्टम दिले आहे. Kubota U17 Mini Excavator ह्या मध्ये 3 पंप सिस्टम देण्यात आली आहे. जी सोबतच बकेट, बूम, आर्म व ट्रॅक या सर्व ऑपरेशन सोबतच ताकदीने ऑपरेट करण्यास मदत करते व ह्या मशीन ला सुपर मिनी मशीन बनवते.

या मध्ये कंपनी फिटेड ब्रेकर पाइप लाइन हि सोबतच येते. याची हायड्रोलिक्स सिस्टम हि अटचमेन्ट साठी हि परिपूर्ण आहे.

Kubota U17 Mini मायलेज

अतिशय फास्ट वर्किंग असलेले हे मशीन 16 hp इंजिन सह येते जे ह्याला पॉवरफूल मशीन बनवतेच, पण ह्या मशीन ला एक कमी उत्पादन खर्च असलेले मशीन हि बनवते. विविध उपलब्ध माहितीच्या आधारे हे Kubota U17 Mini Excavator हे 1.5 लिटर प्रती तास डिसेल घेते अस दिसून आले आहे.

Kubota U17 Mini Excavator

तपशीलमूल्य
मॉडेलU17-3
बकेट क्षमता (m³)0.04
प्रमाणित बकेट रुंदी (ब्लेडसह/विना ब्लेड)450 / 400 मिमी
मशीन वजन (kg)1725
ऑपरेटिंग वजन (ऑपरेटरसह: 75kg)1800
एकूण लांबी (मिमी)3545
एकूण उंची (मिमी)2340
एकूण रुंदी (मिमी)990 / 1240
किमान ग्राउंड क्लीयरन्स (मिमी)150
इंजिन मॉडेलKubota D902-E3-BH-1
डिस्प्लेसमेंट (cc)898
रेटेड आउटपुट (kW (HP) / rpm)12.0 (16.1) / 2300
कमाल खोदाई उंची (मिमी)3540
कमाल डंपिंग उंची (मिमी)2440
कमाल खोदाई खोली (मिमी)2310
कमाल अनुलंब भिंत खोदाई खोली (मिमी)1910
कमाल खोदाई त्रिज्या (मिमी)3900
बूम स्विंग (डावे/उजवे) (अंश)65 / 58
किमान वळण त्रिज्या (स्विंगसह) (मिमी)1440 (1210)
किमान टेल वळण त्रिज्या (मिमी)620
कमाल ब्रेकआउट फोर्स (बकेट) (kN (kgf))15.2 (1545)
ट्रॅक प्रकारस्टील
ट्रॅक रुंदी (मिमी)230
क्रॉलर लांबी (मिमी)1585
टंबलर अंतर (मिमी)1230
प्रवास गती (1ला/2रा गियर) (किमी/ता)1.9 / 3.9
कमाल चढण कोन (अंश)30
स्विंग गती (rpm)9.1
ब्लेड रुंदी (मिमी)990 / 1240
ब्लेड उंची (मिमी)265
कमाल उचल (जमिनीवर/खाली) (मिमी)280 / 190
हायड्रॉलिक पंप प्रकारव्हेरिएबल पंप x 2 + गिअर पंप x 1
स्विव्हल मोटर प्रकारऑर्बिट मोटर
प्रवास मोटर प्रकारहायड्रॉलिक पिस्टन मोटर: 2F
इंधन टाकी क्षमता (L)19

Kubota U17 Mini किंमत

बहु उपयोगी असलेले हे मिनी मॉनस्टर किमतीच्या बाबतीत हि जरा मॉनस्टर च असल्याच दिसून येत आहे. Kubota U17 Mini Excavator ह्याची किंमत हि रु 22 लाख ते 24 लाख रु च्या दरम्यान आहे.

Kubota U17 Mini फायदे व तोटे

मशीन अतिशय छोटे असल्यामुळे वाहतुकीस सोपे जाते.

मशीन अतिशय कमी जागेत जाऊन काम करू शकते.

मशीन देखभाल खर्च खुप कमी येतो.

मशीन विहीर खोदकाम करण्यास अतिशय उपयोगी येत आहे.

अरुंद गल्ली मध्ये, बांधकांम असलेल्या मध्ये जाऊन काम करू शकते.

मशीन छोटे आहे .

मशीन ला लोड करूनच न्यावे लागते.

हे मशीन जे सी बी ला पर्याय ठरू शकत नाही.

1 thought on “Kubota U17 Mini Excavator जगातील सर्वात छोट पोकलेन”

Leave a Comment