HX35Az हा Hyundai Construction Equipment कंपनीच एक अत्याधुनिक 4 टन कॅटेगरी मधील मिनी एक्स्कॅव्हेटर आहे, Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर ला Red Dot Award 2022 मध्ये उत्कृष्ट डिझाइनसाठी सन्मानित करण्यात आले आहे. हे मशीन उच्च कार्यक्षमतेसाठी आणि ऑपरेटरच्या सोयीसाठी डिझाइन करण्यात आले आहे, जो शेती, नगरविकास, नगरपालिका आणि इतर बांधकाम क्षेत्रांसाठी आदर्श मशीन आहे.
Hyundai Excavator
Hyundai Construction Equipment हि भारतातील एक प्रसिद्ध कन्स्ट्रकशन ईक्विपमेंट निर्माता कंपनी आहे. ज्यांची ह्या क्षेत्रातील ईक्विपमेंट मध्ये मोठी रेंज उपलब्ध आहे ज्या मध्ये हे Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर ते HX520 L हे 50 टन पर्यन्त मशीन उपलब्ध आहेत.
Hyundai Construction Equipment 20 ते 25 टन कॅटेगरी एक्सकॅवेटर मध्ये मार्केट लिडर मानली जाते. ह्यांची एक्सकॅवेटर हि उच्च ग्राहक समाधान वर्गातील आहे व कमी खर्च व डिझेल मधील बचतीसाठी ओळखली जातात.

Hyundai HX35Az Specifications
- इंजिन मॉडेल: Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये Kubota D1703 हे इंजिन येते.
- ग्रॉस पॉवर: हे इंजिन 25.2 PS पॉवर आउट पुट @ 2200 rpm वर देते.
- ऑपरेटिंग वेट: ह्या मशीन चे वजन हे 3790 – 4130 किलो आहे.
- बकेट क्षमता: ह्या मशीन ला 0.11 m³ GP ची बकेट येते.
- आर्म लांबी: 1600 मिमी आहे.
- स्विंग स्पीड: ह्या श्रेणीतील उत्तम अशी 9.4 rpm आहे.
- ट्रॅव्हल स्पीड (हाय/लो): हाय ला 4.4 व लो ला / 2.6 किमी/तास आहे.
- कमाल खोदकाम पोहोच: 5460 मिमी हि याची सर्वात जास्त खोदण्याची क्षमता आहे.
- कमाल खोदकाम खोली: 3280 मिमी हि याची सर्वात जास्त खोल खोदण्याची क्षमता आहे.
- टेल स्विंग रेडियस: 900 मिमी.
- बकेट डिगिंग फोर्स: 3281 kgf
- आर्म क्राऊड फोर्स: 1623 kgf
Hyundai HX35Az Performance Features
Hyundai HX35Az Engine
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये उच्च कार्यक्षम Kubota D1703, Tier-4 इंजिन 25 HP पॉवर निर्माण करते, जे इंधन कार्यक्षम, कमी आवाज आणि कमी देखभाल खर्चासह येते.
Hyundai HX35Az कूलंट आणि ल्युब्रिकंट क्षमता
घटक | क्षमता (लिटरमध्ये) |
---|---|
इंधन टाकी (Fuel Tank) | 46.8 |
इंजिन कूलंट (Engine Coolant) | 9.57 |
इंजिन ऑइल (Engine Oil) | 7 |
हायड्रॉलिक टाकी (Hydraulic Tank) | 36 |
हायड्रॉलिक सिस्टम (Hydraulic System) | 63 |
ट्रॅव्हल रेडक्शन गिअर ऑइल (Travel Reduction Gear Oil) | 0.6 (प्रत्येक साइड) |
Hyundai HX35Az Fast Hydraulic System
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये फास्ट हायड्रॉलिक सिस्टम आहे. ओपन-सेंटर हायड्रॉलिक प्रणालीमुळे जॉयस्टिक आणि मुख्य नियंत्रण वॉल यांच्यात जलद समन्वय साधला जातो, परिणामी मशीन वेगाने आणि सहजतेने चालते.
Hyundai HX35Az Dozer Floating
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये डोजर फ्लोटिंग मुळे ग्राउंड अनुकूलतेनुसार डोजरची उंची आपोआप समायोजित होते, ज्यामुळे चांगले फिनिशिंग मिळते.
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये विस्तृत बूम स्विंग अँगल दिलेले आहे जे निवडक ठिकाणी आणि अरुंद जागांमध्ये अधिक चांगले काम करण्यासाठी डिझाइन केलेले.
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये झिरो टेल स्विंग मिळते त्यामुळे ह्या टेल स्विंग डिझाइनमुळे मशीन अरुंद जागांमध्ये सहज फिरू शकते.
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये ऑटो आयडल दिले आहे. जेव्हा मशीन इंजिन चालू असताना न वापरले जात असते, तेव्हा इंजिनचे आरपीएम स्वयंचलितपणे कमी होते, ज्यामुळे इंधन बचत होते.
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये ऑटो शिफ्ट ट्रॅव्हल स्पीड हे उंचीवर जाताना मशीन आपोआप वेग कमी करून उच्च टॉर्क निर्माण करते.
Hyundai HX35Az Operator Cabin
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये ROPS मानकांनुसार प्रीमियम ऑपरेटर केबिन आहे जे की अत्याधुनिक डिझाइन युक्त आहे, ज्यामध्ये विविध पर्याय असलेले सीट, सहज नियंत्रण करता येणारे लिवर आणि पायांसाठी आरामदायक जागा उपलब्ध केलेली आहे.
डिजिटल क्लस्टर हे 5-इंचाचा LCD डिस्प्ले आहे, ज्या मध्ये इंधन स्तर, इंजिन आरपीएम, बॅटरी स्थिती, तापमान आणि अलार्म दर्शवतो.
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये फोल्डेबल पेडल्स दिलेले आहे, हे सर्व पेडल्स फोल्ड करण्यायोग्य आहेत, ज्यामुळे केबिनमध्ये अधिक जागा मिळते.
Hyundai HX35Az Durability and Safety
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये मजबूत अप्पर आणि लोअर फ्रेम दिलेली आहे. ह्या मध्ये उच्च-गुणवत्तेचे स्टील वापरून बनवलेली स्ट्रक्चरल डिझाइन आहे ज्यामुळे फ्रेम ला दीर्घकालीन टिकाऊपणा मिळतो.
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये बळकट बूम आणि आर्म आहेत. जे हाय-टेन्साइल स्टील आणि अत्याधुनिक वेल्डिंग तंत्रज्ञान वापरुन बनवले गेले आहे, जे दीर्घ काळ सर्विस देऊ शकते.
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये सिलिंडर गार्ड्स दिले आहे.
बूम, आर्म आणि बकेट सिलिंडरसाठी मजबूत गार्ड्स देण्यात आले आहेत, जे अपघातांने होणारे नुकसान टाळतात.
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये ROPS मानकांनुसार सुरक्षितता प्रमाणपत्र पात्र केबिन आहे जे ऑपरेटरला जास्त सुरक्षितता प्रदान करते.
Hyundai HX35Az Easy Service
संपूर्णपणे उघडता येणारे पॅनल मुळे इंजिन आणि हायड्रॉलिक सिस्टम हे सहज उपलब्ध होते. Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये पूर्ण ओपन काउल डिझाइन आहे ज्यामुळे इंजिन आणि कंट्रोल यूनिट ची सहज देखभाल करता येते.
तसेच टिल्ट केबिन आहे. जे केबिन सहज उचलता येतो, ज्यामुळे दुरुस्ती सोपी होते. 2-पार्ट डोजर होज आहेत ज्यामुळे हायड्रॉलिक होज दुरुस्ती करणे सोपे होते.
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर मध्ये इंजिन सर्विस हि दर 400 तासांनी, हायड्रॉलिक फिल्टर 1000 तासांनी, आणि हायड्रॉलिक ऑइल 5000 तासांनी बदलायचे असते, ज्यामुळे कमी खर्चात देखभाल होते.
Hyundai HX35Az Mileage
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर हे एक उच्च-कार्यक्षम, इंधन-बचत करणारे आणि ऑपरेटरसाठी आरामदायक असे मिनी एक्स्कॅव्हेटर आहे. त्याच्या आधुनिक वैशिष्ट्यांमुळे ते अधिक इंधन बचत करते हे मिनी एक्स्कॅव्हेटर तासाला 3 लिटर डिझेल घेते.
Hyundai HX35Az Price
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर हे एक अतिशय प्रसिद्ध असे मशीन आहे. ह्या मशीन ची किंमत हि 32 लाख ते 34 लाख दरम्यान आहे जी तुमच्या शहरा नुसार थोड्याफार प्रमाणात बदलू शकते.
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर हा एक उच्च-कार्यक्षम, इंधन-बचत करणारा आणि ऑपरेटरसाठी आरामदायक असा मिनी एक्स्कॅव्हेटर आहे. त्याच्या आधुनिक वैशिष्ट्यांमुळे, तो शेती, नगरपालिका आणि बांधकाम क्षेत्रांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरतो.
2 thoughts on “Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर”