Royal Enfield च्या मोटरसायकल ह्या बाइक प्रेमींसाठी फक्त मोटरसायकल नाही तर त्यांच्या मनाची एक भावना असते. Royal Enfield च्या Classic 350 ने ह्या एतीहासिक ब्रॅंड ला नव वैभव प्राप्त करून दिले आहे. त्यातीलच एक खास व अनोखा अवतार Royal Enfield Goan Classic 350 समोर आणलाय, गोंवण क्लासिक म्हणजे खास गोवा शैलीत हि बाइक बनवण्यात आली आहे.

Royal Enfield Goan Classic 350 Design And Look
Royal Enfield ने ह्या Royal Enfield Goan Classic 350 बाईकचे डिझाइन पारंपरिक क्लासिक ३५० प्रमाणेच आकर्षक ठेवले आहे, पण त्याला दिलेला खास गोवन टच हाच त्याचा वेगळेपणा दर्शवतो.
Royal Enfield Goan Classic 350 मध्ये काही खास वैशिष्ट्ये आणि डिझाइनचे घटक आहेत, जे तिला इतर बाइक्सपासून, विशेषतः रॉयल एनफील्डच्या इतर मॉडेल्सपासून आणि बाजारातील स्पर्धकांपासून वेगळे बनवतात. चला, हे वेगळेपण काय आहे ते पाहूया,
बॉबर-स्टाइल डिझाइन
एप-हँडलबार 👉 (Ape Hanger Handlebar) Royal Enfield Goan Classic 350 मध्ये उंच आणि पुढे वळलेले हँडलबार आहे, जे रायडरला मागे झुकून बसण्याची आणि आरामदायक रायडिंग पोझिशन मिळवण्याची सुविधा देते. हे पारंपारिक क्लासिक 350 किंवा मिटिओर 350 मध्ये नाही.
चॉप्ड फेंडर्स 👉 समोर आणि मागील फेंडर्स छोटे आणि कापलेले आहेत, ज्यामुळे Royal Enfield Goan Classic 350 ला मिनिमलिस्ट आणि कस्टम बॉबर लूक मिळतो.
सिंगल-सीट डिझाइन 👉 ही Royal Enfield Goan Classic 350 डिफॉल्ट सिंगल-सीटसह येते (पिलियन सीट पर्यायी आहे), जे बॉबर स्टाइलचे वैशिष्ट्य आहे आणि तिला इतर रॉयल एनफील्ड बाइक्सपेक्षा वेगळे करते, ज्या बहुतेक ड्युअल-सीटसह येतात.
रेट्रो-मॉडर्न लूक
Royal Enfield Goan Classic 350 मध्ये रेट्रो आणि मॉडर्न डिझाइनचा संगम आहे. उदाहरणार्थ, राउंड हेडलॅम्प आणि टियरड्रॉप टँक रेट्रो वाइब देतात, तर ट्यूबलेस टायर्स आणि आकर्षक रंग पर्याय (जसे की मॅट फिनिश) तिला आधुनिक बनवतात.
जसे इतर रॉयल एनफील्ड मॉडेल्स (उदा. क्लासिक 350, हंटर 350) पूर्णपणे रेट्रो किंवा स्क्रॅम्बलर स्टाइलवर लक्ष केंद्रित करतात, पण गोवण क्लासिकमध्ये बॉबर टच आहे.
Royal Enfield Goan Classic 350 या बाईकला खास रंगसंगती आणि फिनिश दिलेली आहे, जी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांसारखीच प्रसन्न आणि आकर्षक वाटते. गोल हेडलॅम्प, क्रोम फिनिश, उंच हँडल बार, खास शैलीतील टायर व रिम आणि विंटेज लूक हे या बाईकचे मुख्य आकर्षण आहे.
Royal Enfield Goan Classic 350 ला तिचे नाव आणि डिझाइन (उदा. रंग पर्याय आणि मिनिमलिस्ट स्टाइल) या खास गोंवण थीमला प्रतिबिंबित करतात. हे तिला इतर बाइक्सपासून सांस्कृतिक आणि भावनिकदृष्ट्या वेगळे करते आहे.
Royal Enfield Goan Classic 350 Engine And Performance
Royal Enfield ने या बाईकमध्ये 349 cc क्षमतेचे BS6 मानक इंजिन आहे, जे २०.२ bhp पॉवर वर २७ Nm टॉर्क निर्माण करते. नवीन तंत्रज्ञानामुळे ही Royal Enfield Goan Classic 350 बाईक अधिक स्मूथ आणि विश्वसनीय झाली आहे. ५-स्पीड गिअरबॉक्स मुळे राइड आणखी आरामदायक होते. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही बाईक अत्यंत उपयुक्त आहे.
Goan Classic 350 – मुख्य वैशिष्ट्ये
वैशिष्ट्य | तपशील |
---|---|
इंजिन क्षमता | ३४९ cc |
मायलेज – ARAI | ३६.२ kmpl |
गियरबॉक्स | ५-स्पीड मॅन्युअल |
कर्ब वजन | १९७ kg |
इंधन टाकीची क्षमता | १३ लिटर |
सीटची उंची | ७५० mm |
अन्य फायदे | ८७% क्रूझर बाईक्सपेक्षा अधिक मायलेज |
रायडिंग पोझिशन
Royal Enfield Goan Classic 350 चा उंच हँडलबार आणि मागे सरकलेली सीट यामुळे रायडिंग पोझिशन अधिक आरामदायक आणि क्रूझरसारखी आहे. क्लासिक 350 मध्ये रायडर सरळ बसतो, तर मिटिओरमध्ये क्रूझर स्टाइल आहे, पण गोवण क्लासिकमध्ये बॉबरचा खास फील मिळतो हा ह्या मोटरसायकल ला वेगळ बनवतो.
कस्टमायझेशनचा टच
Royal Enfield Goan Classic 350 ही बाइक कस्टम-बिल्ट बाइक सारखी दिसते, ज्यामुळे ती रेडीमेड मॉडेलपेक्षा वेगळी आणि युनिक वाटते. उदाहरणार्थ, सिंगल-सीट ऑप्शन आणि मिनिमल फेंडर्स हे कस्टम बाइक कल्चरमधून प्रेरित आहेत.
Comfort And Driving Experience
Royal Enfield Goan Classic 350 हि बाइक रायडरला उत्तम कम्फर्ट आणि कंट्रोल देते. हिचे अतिशय चांगले सस्पेन्शन आणि मजबूत चेसिस रस्त्यावरील कोणत्याही परिस्थितीत स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान करते. सॉफ्ट सीटिंग आणि एर्गोनॉमिक रचनेमुळे लांबचा प्रवास करताना देखील थकवा जाणवत नाही. यातून शहरातील तसेच लांबच्या प्रवासाचा आनंद सहज घेता येतो.
Royal Enfield Goan Classic 350 Break and safety
Royal Enfield च्या मोटरसायकल ह्या वजनदार व अधिक ताकदिच्या असतात, त्यामुळे ह्या मोटरसायकल मध्ये सुरक्षा हा मोटरसायकल साठी महत्त्वाचा विषय असतो, आणि Royal Enfield Goan Classic 350 यात कुठलीही तडजोड करत नाही.
- ड्युअल-चॅनल ABS ब्रेकिंग सिस्टम दिली आहे, त्यामुळे ती अधिक सुरक्षित ठरते.
- समोर टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे ट्विन शॉक अब्जॉर्बर्स आहेत.
- ट्यूबलेस टायर्स दिले आहेत त्यामुळे अचानक पंक्चर झाल्यासही स्थिरता राखली जाते.
- मजबूत चेसिस आणि उच्च प्रतीच्या ब्रेक्समुळे ती वेगवान असतानाही पूर्ण नियंत्रण करण्यास सोपी जाते.
- दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत, समोर 320 mm डिस्क ब्रेक व पाठीमाघे 270 mm डिस्क ब्रेक दिले आहे ज्यामुळे सुरक्षितता वाढते.
ब्रेक्स, व्हील्स आणि सस्पेन्शन
वैशिष्ट्य | तपशील |
फ्रंट सस्पेन्शन | टेलिस्कोपिक, ४१ mm फोर्क्स, १३० mm ट्रॅव्हल |
रियर सस्पेन्शन | ट्विन ट्यूब इमल्शन शॉक अॅब्जॉर्बर, ६-स्टेप अॅडजस्टेबल प्रीलोड |
ब्रेकिंग सिस्टम | ड्युअल चॅनल ABS |
फ्रंट ब्रेक प्रकार | डिस्क |
Royal Enfield Goan Classic 350 special features
Royal Enfield Goan Classic 350 मध्ये नवीन अनेक विशेष वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जसे की ..
- गोल LED हेडलाइट – रात्रीच्या प्रवासासाठी उत्तम प्रकाशव्यवस्था.
- नवीन डिजिटल-ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर – स्पीड, ट्रिपमीटर, फ्यूल इंडिकेटर आणि घड्याळ यांसारखी महत्त्वाची माहिती.
- ट्यूबलेस टायर्स आणि अॅलॉय व्हील्स – आधुनिक स्वरूप आणि जास्त टिकाऊपणा. विशेष असे डिझाईन केलेले अल्लॉय व्हील ह्या गाडीचे विशेष वैशिष्ट्ये म्हणता येईल.
- इको-फ्रेंडली इंजिन – BS6 मानकांनुसार उत्सर्जन कमी करणारे इंजिन.
- पिलियन सीट – काढता येण्याजोगी आहे, ज्यामुळे ती सिंगल रायडरसाठी अधिक आकर्षक बनते.
- फ्रंटमध्ये 19 इंच आणि मागे 16 इंच स्पोक व्हील्स आहेत, ज्यावर ट्यूबलेस टायर्स बसवलेले आहेत.
- उच्च गुणवतेचे सीट हे प्रिमियम फील देते.
- स्पेशल 90 स् चा फील देणार इंजिन साऊंड हा ह्या मोटरसायकल च विशेष वैशिष्ट्ये म्हणता येईल.
डायमेंशन्स आणि चेसिस
वैशिष्ट्य | तपशील |
कर्ब वजन | १९७ kg |
सीटची उंची | ७५० mm |
ग्राउंड क्लीयरन्स | १७० mm |
एकूण लांबी | २१३० mm |
Royal Enfield Goan Classic 350 Mileage
Royal Enfield Goan Classic 350 ही केवळ पॉवरफुल मोटरसायकल नाही तर मायलेजच्या बाबतीतही प्रभावी मोटरसायकल मानली जाते. सरासरी ३५-४० kmpl मायलेज मिळते, जे लॉन्ग राईड्ससाठी अतिशय उत्तम आहे व भारतीय रायडर याला खुप पसंत करतात.
Royal Enfield Goan Classic 350 Price
Royal Enfield Goan Classic 350 ची किंमत अंदाजे ₹2.35 ते 2.65 लाख आहे. ही बाईक रॉयल एनफिल्डच्या अधिकृत डीलरशिपमध्ये उपलब्ध आहे. इच्छुक खरेदीदार ऑनलाईन बुकिंगद्वारेही आपली बाईक आरक्षित करू शकतात.
Royal Enfield Goan Classic 350 Color
Royal Enfield Goan Classic 350 चे स्पेअल आकर्षण आहे ते तिच्या कलर मध्ये व आकर्षक रंगसंगती मध्ये, या मोटरसायकल मध्ये 4 कलर उपलब्ध आहेत

- Shack Black
- Purple Haze
- Rave Red
- Trip Teal
Read Also 👇
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर
Royal Enfield Goan Classic 350 ही केवळ एक बाईक नसून एक आयकॉनिक रायडिंग अनुभव आहे. तिचे आकर्षक डिझाइन, दमदार इंजिन आणि उत्कृष्ट रायडिंग कम्फर्ट हे तिला इतर बाईकपेक्षा वेगळे बनवतात. जर तुम्हाला गोव्याच्या मोकळ्या वातावरणात रॉयल एनफिल्डच्या शानशौकतीसह प्रवास करायचा असेल, तर ही बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
का घ्यावी ?
जर तुम्हाला रॉयल एनफील्डची क्लासिक अपील हवी असेल, पण त्यासोबतच एक वेगळा, बॉबर-स्टाइल लूक आणि रायडिंग अनुभव हवा असेल, तर Royal Enfield Goan Classic 350 तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. ती लांबच्या प्रवासासाठी आरामदायक आणि स्टायलिश आहे.
राम राम मित्रांनो मी Uddhav K. मी गेली काही वर्ष ऑटोमोबाइल व टेक्निकल क्षेत्रा विषयी खुप सखोल माहिती ठेवून असतो. हि सर्व माहिती सरळ सोप्या भाषेत आपल्या पर्यन्त विविध सोशल मिडिया मार्फत पोहोचवत असतो, त्यातील हा एक प्रयत्न…