I Phone 16 e बजेट मधला आय फोन घ्यावा कि नको ?

Apple ने त्यांच्या I Phone 16 सीरिजमध्ये नवीन आणि किफायतशीर असे स्वस्त मॉडेल I Phone 16 e लाँच केले आहे. हा फोन अत्याधुनिक फीचर्ससह येतो, ज्यामुळे तो बजेट-फ्रेंडली आयफोन शोधणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरतो आहे.

I Phone 16 e हा उत्कृष्ट प्रोसेसर, शानदार डिस्प्ले, खुप जबरदस्त अशी बॅटरी लाइफ आणि नवीन सॉफ्टवेअर यांसह हा स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. तसेच अप्पल इंटेलिजेन्ट हि अडवांस लेवल असणार आहे.

I Phone 16e
I Phone 16 e Image Credit Apple
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

डिझाइन आणि डिस्प्ले

I Phone 16 e मध्ये 6.1 इंचाचा OLED सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2532×1170 पिक्सल आणि 460 ppi पिक्सेल डेन्सिटी आहे. हा डिस्प्ले 1200 निट्स ब्राइटनेस सह येतो, ज्यामुळे तुम्हाला उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव मिळतो. डिस्प्लेचे संरक्षण सिरेमिक शील्डद्वारे केले जाते, जे त्याला अधिक टिकाऊ बनवते. फोनचा डिझाइन iPhone 14 प्रमाणेच नॉचसह आहे, जो क्लासिक आणि आकर्षक दिसतो

या मध्ये बॅक ला मिनरल ग्लास दिला आहे, हा फोन वॉटर रेसिस्टन्स् आणि डस्ट प्रूफ आहे. जो की IP 68 वर आधारित आहे. 6 मीटर पाण्यामध्ये 30 मिनिट पर्यन्त राहू शकतो.

I Phone 16 e ची रचना थोडीशी जुनी आहे, हि ह्या फोनची कमजोर बाजू म्हणता येईल, तसेच बॅक ला असलेला एकच कॅमेरा, 1200 निट्स च ब्राइटनेस हि खुप निराश करते, तसेच फिंगरप्रिंट सेन्सर हि दिला नाही त्यामुळे हा फोन थोडासा विचार करता महागडा वाटतो.

SpecificationValue
Height146.7 mm
Width71.5 mm
Thickness7.80 mm
Weight167 g
  • 6.1 इंच OLED Super Retina XDR डिस्प्ले (2532×1170 पिक्सेल, 460 ppi)
  • सिरेमिक शील्ड प्रोटेक्शनसह टिकाऊ डिझाइन
  • एल्यूमिनियम फ्रेम व ग्लास बॅक

I Phone 16 e परफॉर्मन्स

I Phone 16 e मध्ये Apple चा नवीनतम A18 चिपसेट आहे, जो 3nm प्रोसेसर वर आधारित आहे. हा प्रोसेसर फोनला वेगवान आणि कार्यक्षम बनवतो, ज्यामुळे तुम्हाला स्मूथ आणि जलद परफॉर्मन्स अनुभवायला मिळतो. याशिवाय, फोनमध्ये Apple चा इन-हाऊस C1 मॉडेम आहे, जो उत्कृष्ट 5G कनेक्टिव्हिटी प्रदान करतो आणि बॅटरीची कार्यक्षमता वाढवतो. कंपनीच्या दाव्यानुसार, या संयोजनामुळे बॅटरी आयुष्य लक्षणीयरीत्या सुधारले आहेत.

  • नवीन A18 प्रोसेसर (जलद आणि स्मूद परफॉर्मन्ससाठी)
  • Apple C1 5G मॉडेमसह वेगवान 5G कनेक्टिविटी
  • 26 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक बॅटरी बॅकअप
  • USB-C पोर्टद्वारे फास्ट चार्जिंग सुविधा

I Phone 16 e कॅमेरा

फोटोग्राफीसाठी हे फोन उत्तम मानले जातात, I Phone 16e मध्ये 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे, जो 1.6 व अल्ट्रा वाइड-अँगल लेन्स सह येतो. हा कॅमेरा उच्च गुणवत्तेचे फोटो आणि व्हिडिओ तयार करतो. या मध्ये 10x डिजिटल झुम व ऑटो फोकस फेस डिटेक्टशन ड्युल कलर फ्लॅश आहे. 8000 x 6000 पिक्सेल इमेज रेसुलेशन मध्ये येतो.

Single 48 MP Back Camera in I Phone 16 e
I Phone 16 e

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो 1.9 वाइड-अँगल लेन्स23 mm फोकल लेनथ ऑटो फोकस आहे, जो स्पष्ट आणि सुंदर सेल्फी प्रदान करतो.

  • 48 MP मुख्य कॅमेरा उच्च दर्जाच्या फोटोंसाठी
  • 12 MP फ्रंट कॅमेरा उत्तम सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी
  • iOS 18 व Apple Intelligence तंत्रज्ञानासह नवीन अनुभव
  • कस्टमायझेबल अॅक्शन बटण सोयीस्कर शॉर्टकटसाठी

I Phone 16 e बॅटरी आणि चार्जिंग

I Phone 16 e मध्ये इनबिल्ट 3961 mAh रिचार्जेबल लिथियम-आयन बॅटरी आहे, जी 26 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक प्रदान करते. ही बॅटरी iPhone 11 पेक्षा 6 तास अधिक आणि iPhone SE सीरिजमधील सर्व फोनपेक्षा 12 तास अधिक टिकाऊ आहे. चार्जिंगसाठी फोनमध्ये USB-C पोर्ट आहे, जो 30 W वेगवान चार्जिंग ला समर्थन देतो. तसेच, वायरलेस चार्जिंग ची सुविधाही उपलब्ध आहे.

I Phone 16e हा फोन नवीन टाइप सी चार्जिंग तसेच डेटा कॉर्ड देण्यात आले आहे. हि या फोनची एक जमेची बाजू म्हणत येईल. हा फोन अवघ्या 30 मिनिट मध्ये 30 w फास्ट चार्जर वर 50% चार्ज होतो.

I Phone 16 e तांत्रिक स्पेसिफिकेशन

फीचरतपशील
डिस्प्ले6.1″ OLED Super Retina XDR
प्रोसेसरA18 चिप
रॅम6GB
स्टोरेज ऑप्शन्स128GB / 256GB / 512GB
मुख्य कॅमेरा48MP
फ्रंट कॅमेरा12MP
ऑपरेटिंग सिस्टमiOS 18
बॅटरी26 तास व्हिडिओ प्लेबॅक
चार्जिंगUSB-C, फास्ट चार्जिंग
5G सपोर्टहोय

I Phone 16 e सॉफ्टवेअर आणि फीचर्स

I Phone 16 e हा iOS 18 वर चालतो, जो नवीन आणि अतिशय अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टम आहे. फोनमध्ये Apple Intelligence फीचर समाविष्ट आहे, ज्यामुळे Siri अधिक स्मार्ट आणि उपयुक्त बनते. हे फीचर अनेक नवीन भाषा ओळखते, ज्यात इंग्रजी (भारत) समाविष्ट आहे.

I Phone 16 e याच्या मदतीने तुम्ही फोटो एडिटिंग, स्मार्ट शोध, आणि इमोजी क्रिएशन सारखे कार्ये सहजपणे करू शकता. तसेच फोनमध्ये कस्टमायझेबल अॅक्शन बटण आहे, ज्याद्वारे तुम्ही विविध शॉर्टकट्स आणि फंक्शन्स सेट करू शकता.

I Phone 16 e किंमत आणि उपलब्धता

I Phone 16 e भारतात तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे 128GB, 256GB, आणि 512GB. परंतु या मध्ये कोणताही मेमोरी कार्ड स्लॉट दिला नाही त्यामुळे मेमोरी वाढवता येणार नाही.

I Phone 16 e च्या

128GB मॉडेलची किंमत 59,900 रुपये ठेवण्यात आली आहे,

256GB मॉडेलची किंमत 69,900 रुपये ठेवण्यात आली आहे,

512GB मॉडेलची किंमत 89,900 रुपये ठेवण्यात आली आहे.

फोन ब्लॅक आणि व्हाईट या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. प्री-ऑर्डर 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाल्या होत्या, आणि विक्री 28 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे.

I Phone 16 e कलर

I Phone 16 e बजेट मधला आय फोन हा अप्पल ने कॉस्ट कटिंग करून बनवला आहे हे सतत जाणवत आहे. अप्पल ने ह्या मध्ये फक्त ब्लॅक आणि व्हाईट हे दोनच कलर दिले आहेत. त्यामुळे हा फोन काहीसा निराश करतो.

I Phone 16 e फायदे अण तोटे

I Phone 16 e हा फोन उत्कृस्ठ फोन आहे परंतु त्यात हि काही कमतरता आहेत तर काही जमेच्या बाजू हि आहेत. आपण प्रथम जाणून घेऊ या ह्यातील जमेच्या बाजू…

  • पॉवरफूल प्रोसेसर A18 बायोनिक चिप.
  • सर्वोत्कष्ट बॅटरी लाइफ.
  • USB C पोर्ट .
  • अप्पल इंटेलेजन्ट खुप छान चालतो .

वरील प्रमाणे जमेच्या बाजू आहेत तश्या काही कमतरता हि आहेत त्या पुढील प्रमाणे ..

  • वरच्या सिरिज प्रमाणे डिस्प्ले नाही, ब्राइटनेस खुप कमी वाटतो.
  • डिस्प्ले च्या बेझेल खुप मोठया आहेत त्याने फोन जुना वाटतो.
  • किंमत खुप जास्त आहे.
  • कॅमेरा हि निराश करू शकतो. कारण या मध्ये खुप कॉस्ट कटिंग केली आहे.
  • wifi 7 हि दिला नाही.
  • कलर ऑप्शन हि नाहीत, लुक खुप जूना वाटतो.
  • मॅगसेफ वाइरेलेस चार्जिंग सपोर्ट नाही.
Read Also 👇

JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB”

I Phone 16e कोणासाठी योग्य ?

  • बजेटमध्ये प्रीमियम iPhone शोधणाऱ्यांसाठी उत्तम फोन.
  • तरुण वर्ग व किफायतशीर पर्याय शोधणाऱ्यांसाठी हि उत्तम.
  • उत्तम बॅटरी आयुष्य व जलद चार्जिंग गरज असलेल्या वापरकर्त्यांसाठी.

I Phone 16e हा एक किफायतशीर आणि अत्याधुनिक स्मार्टफोन आहे, जो उत्कृष्ट परफॉर्मन्स, दीर्घ बॅटरी आयुष्य, आणि नवीन फीचर्ससह येतो. बजेटमध्ये एक प्रीमियम आयफोन शोधत असाल, तर I Phone 16e नक्कीच एक उत्तम पर्याय आहे.

1 thought on “I Phone 16 e बजेट मधला आय फोन घ्यावा कि नको ?”

Leave a Comment