New Bajaj Chetak 35 Series बजाज चा नवा धमाका 35 सिरिज लॉंच

2025 च्या सुरुवातीलाच बजाज ने आपल्या New Bajaj Chetak 35 सिरिज लॉंच केली त्याविषयी आपण बघणार आहोत. बजाज चेतक म्हंटले की आपल्या पुढे उभा राहतो तो 1990 चा काळ, स्टँड वर लाऊन क्रॉस करून किक मारून चालू करण्याची एक हटके स्टाइल.

बजाज चेतक चा 90 च्या दशकात एक वेगळाच तोरा होता, 150 cc 2 स्ट्रोक इंजिन मध्ये येणारे हे स्कूटर हमारा बजाज ह्या टॅग लाइन वर लोक फिदा होते. परंतु नवनवीन येणारे प्रॉडक्ट अण वाढत्या स्पर्धेत बजाज ने 2005 ला चेतक चे उत्पादन बंद केले अण हा एक क्लाससीकल प्रवास थांबला.

2019 ला बजाज ने नवीन चेतक ची घोषणा करून बजाज ने ह्या क्लासिकल प्रवासास पुन्हा सुरुवात केली परंतु ती करत असतानी जपला तो हिचा सांस्कृतिकपणा व डिझाईन चा क्लासिकल बाज. अण पारंपरिक पेट्रोल एवजी ह्यावेळी आले ते इलेक्ट्रिक घेऊन. अत्यंत आधुनिक परंतु तितकेच कलासिकल डिझाईन ह्या New Bajaj Chetak स्कूटर ला प्रीमियम लुक देते त्याचवेळी हिला असलेली मेटल बॉडी दणकट पणा आधोरेखित करते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

New Bajaj Chetak 35 Series Feature

संपूर्ण मेटल बॉडी असलेली New Bajaj Chetak हि एकमेव स्कूटर आहे. चेतक च मुख्य वैशिष्ठे च हे आहे की ती अतिशय देखणी बनवत असताना हि जपला आहे तो तिचा क्लासिकल अवतार.

  • आकर्षक नवीन डिझाईन, नव्या रूपात तोच सर्वाना हवा असलेला क्लासिकल अंदाज.
  • आकर्षक व प्रीमियम रंगसंगती ह्या स्कूटर ला रुबाबदार बनवतात
  • डिजिटल कन्सोल 7 इंच टीएफटी टच स्क्रीन
  • टर्न बाय टर्न नॅवीगेशन द्वारे आपण मॅप वापरुन प्रवासात सहजता आणू शकतो.
  • जिओ फेन्सिंग अँड स्पीड लिमिट सुरक्षा ह्या द्वारे आपण आपल्या मुलांवर लक्ष ठेऊन त्यांना सुरक्षित ठेऊ शकतो.
  • रेजेनरेटीव ब्रेक सिस्टम जो की अधिकची रेंज मिळून देतो व ब्रेक पॅड च हि आयुष्य वाढऊन मिळते.
  • रियल टाइम बॅटरी स्टेटस आणि बॅटरी रेंज एस्टीमायजेशन प्रवासात असताना किती बाकी आहे अगदी अचूक स्थिति दाखवत राहतो.
  • स्मार्ट फोन कनेक्टीवीटी साठी स्पेशल डिझाईन New Bajaj Chetak अॅप्लिकेशन दिले आहे.

New Bajaj Chetak 35 Series Design

कम्फर्ट च्या बाबतीत New Bajaj Chetak बनवताना बजाज ने अतिशय काळजी पूर्वक ग्राहकाच्या आरामदायक प्रवासाचा विचार केलेला दिसून येतो. सोबतच मोकळा फ्लॅटबॉर्ड दिलेला आहे जो आधिकच्या सामनासाठी योग्य जागा मिळून देतो.

New Bajaj Chetak मध्ये 35 लिटर अन्डर सीट स्टोरेज दिलेला आहे ज्यात आपण 2 हेलमेट सुद्धा ठेऊ शकतो. फ्रंट ग्लोव बॉक्स दिला आहे ज्यामध्ये फोन चार्ज करता येतो व पर्स वैगरे ठेऊ शकतो.

New Bajaj Chetak मध्ये रिवर्स मोड दिल आहे ज्याद्वारे वयस्कर लोकाना अडचणीच्या ठिकाणी स्कूटर माघे घेण्यासाठी वापर करता येतो. IP 67 बॅटरी आणि मोटर देण्यात आली आहे जी पाऊस अथवा पाण्यात हि कार्यक्षम राहते व काळजीवीरहित प्रवासाची हमी देते.

New Bajaj Chetak 35 Series Security Feature

प्रवास करताना सुरक्षित प्रवास व्हवा हाच प्रतेकाचा हेतु असतो, New Bajaj Chetak मध्ये पण हा विचार केलेला दिसून येतो जसे की बॅलन्स ब्रेकिंग साठी चेतक मध्ये CBS ( Combined breking system ) देण्यात आला आहे.

New Bajaj Chetak च्या टॉप च्या मॉडेल मध्ये फ्रंट डिस्कABS ( Anti lock breking system ) हि दिले आहे. सुरक्षितते साठी मेटल बॉडी दिली आहे. LED हेड लाइट उत्तम प्रकाश देतात व स्टाइल हि प्रदान करतो. ऑटोमॅटिक सेफ्टी कट ऑफ हि देण्यात आल आहे जे अपघाती करेंट पासून बचाव करते.

New Bajaj Chetak 35 Series Battery and IDC Range

बजाज हि भारताच्या मातीचा आणि माणसांचा मोठा अनुभव असलेली कंपनी आहे. त्यांना माहिती आहे की काय हवय काय नको. त्यांनी New Bajaj Chetak ह्या स्कूटर मध्ये 4.08 kw इलेक्ट्रिक ( 5.47 hp ) मोटर दिली आहे, ती कुठल्याही रस्त्याच्या प्रकारात अतिशय सक्षम प्रकारे काम करते.

New Bajaj Chetak मध्ये 3.5 kwh लिथियम इऑन बॅटरी दिली आहे जी 153 किलोमीटर ( IDC ) रेंज मिळून देते, जी शहरातील वापरासाठी खुप उपयोगी पडते.

New Bajaj Chetak हि स्कूटर 0 ते 80% बॅटरी 3 तासात चार्ज करन्यास सक्षम असलेल्या ऑन बोर्ड चार्जर सह येते. तसेच ह्या स्कूटर मध्ये दोन राइडिन्ग मोड Eco आणि Sport आहे, स्पोर्ट मोड मध्ये टॉप स्पीड 73 आहे.

New Bajaj Chetak ला कंपनी ने 3 वर्ष 50000 किलोमीटर warenty देण्यात आली आहे. व विविध प्लान नुसार आपण टी वाढवून घेऊ शकतो.

New Bajaj Chetak 35 Series Price

New Bajaj Chetak हिची प्रारंभीक किमत 95 हजार ते 1 लाख 20 हजार पासून एक्स शोरूम सुरू होते. जी की सर्वसामन्यासाठी एक मोठा प्लस पॉइंट ठरू शकतो, व ह्या मधून बजाज चेतक पासून दूर असलेला वर्ग बजाज जवळ येऊ शकतो.

हमारा बजाज पासून सुरू झालेला प्रवास आज आधुनिकतेच्या कसोटीवर हि उजळून निघतोय हेच बजाज च यश म्हणव लागेल, अतिशय योग्य किंमत व बजाज चा भरवसा हे दोन चेतक ला नवीन भरारी देत आहेत.

New Bajaj Chetak Variant

New Bajaj Chetak मध्ये तीन व्हेरियन्ट देण्यात आले आहे.

New Bajaj Chetak 3501

हे व्हेरियनट 3.5 kWh बॅटरी सह येते व 153 किमी idc रेंज देते , New Bajaj Chetak 0 ते 80% 3 तासात चार्ज होते, 7 इंच टीएफटी टच स्क्रीन डिस्प्लेफॉब की, ऑन बोर्ड चार्जर, तसेच ऑटो कॅन्सल सेक्वेनसीयल इंडिकेटोर हे विशेष फिचर्स आहेत.

New Bajaj Chetak 3502

हे व्हेरियनट हि 3.5 kWh बॅटरी सह येते व 153 किमी idc रेंज देते , New Bajaj Chetak 0 ते 80% 3 तास 25 मिनिटात चार्ज होते, ऑफ बोर्ड चार्जर, 7 इंच कलर टीएफटी डिस्प्लेरेगुलर की, तसेच टर्न बाय टर्न नविगेशन हे विशेष फिचर्स आहेत.

New Bajaj Chetak 2903

हे व्हेरियनट हि 2 .9 kWh बॅटरी सह येते व 123 किमी idc रेंज देते , New Bajaj Chetak 0 ते 80% 4 तासात चार्ज होते, दोन्ही हि ड्रम ब्रेक, 21 लिटर बूट स्पेस व टॉप स्पीड 60 किमी सह येते.

New Bajaj Chetak Pros and Cons

New Bajaj Chetak चे काही फायदे

  • रेट्रो मॉडर्न डिझाईन जो एक क्लासिकल चा हि फील देतो
  • मजबूत तसेच मेटल बॉडी
  • रिवर्स मोड
  • आरामदायक राइड अनुभव व बजाज चा विश्वास
  • शहरात वापरण्यासाठी अतिशय उत्तम

New Bajaj Chetak चे काही तोटे

  • माघे ड्रम ब्रेक
  • तुलनेत कमी असलेला बूट स्पेस
  • स्पर्धकापेक्षा कमी रेंज
  • अनेक प्रीमिउम फिचर साठी टेक पॅक विकत घ्यावा लागणे

एकूण New Bajaj Chetak हि स्कूटर एक उत्तम परंतु काहीसा महागडा इलेक्ट्रिक स्कूटर पर्याय उपलब्ध करते, हि स्कूटर एक प्रीमिउम फील देते परंतु ग्रामीण भागासाठी थोडीशी महाग व कमी रेंज ह्याचा हि विचार करण्यास भाग पाडते.

ह्या लेखातील सर्व माहिती हि New Bajaj Chetak च्या अधिकृत वेबसाइट वरुण घेण्यात आली आहे. व इतर काही माहीत इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या विविध स्त्रोत मार्फत संकलित केली आहे. ह्या मधील सर्व माहिती बद्दल काही माहिती अथवा तक्रार असल्यास संपर्क करा.

1 thought on “New Bajaj Chetak 35 Series बजाज चा नवा धमाका 35 सिरिज लॉंच”

Leave a Comment