आज काल शेअर मार्केट हा जनमाणसात चर्चेचा विषय आहे. कुठेही आपण गप्पा करतानी शेअर मार्केट चा विषय निघतोच, मग आपल्या मनात विचार येतो का Share Market Mhanje Kay. शेअर मार्केट समजून घेताना मुळात शेअर म्हणजे काय ते माहीत असणे आवश्यक आहे. कारण जर शेअर काय आहे, तो कसा काम करतो, मार्केटचा त्यात काय रोल असतो ते समजून घ्याव लागेल.
शेअर म्हणजे काय
Share market mhanje kay ? हा आपल्याला पडलेला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, तो समजून घेताना आपल्याला शेअर म्हणजे काय हा प्रश्न पडतो. तो आपण थोडक्यात समजून घेऊ या. कंपनीला किंवा संस्थेला उत्पादन अथवा आस्थपणा चालवताना भांडवली खर्च करावा लागतो किंवा असलेले कर्ज फेडण्यासाठी निधी ची ज्यावेळी गरज भासते त्यावेळी कंपन्याकडे दोन पर्याय असतात, एक असतो कर्ज घेणे व दूसरा असतो पब्लिक ऑफरिंग च्या माध्यमातून भांडवल उभा करणे. म्हणजे आपल्या आस्थापनेची एक मार्केट किमत ठरवली जाते त्यातून त्याचे भाग ठरवले जातात त्या भागाची एक किमत असते. थोडक्यात तो जो प्रत्येक भाग असतो तो असतो “शेअर“. ह्यासाठी एक सिस्टम असते त्याला शेअर मार्केट म्हणतात.
शेअर मार्केट मध्ये IPO म्हणजे काय असतो
थोडक्यात काय तर शेअर म्हणजे भाग, Share market mhanje kay हे समजून घेताना त्याचा प्रत्येक पैलु आपल्याला समजून घ्यावा लागेल. संबंधित कंपनी किंवा संस्था जेव्हा ठरवते की आपण शेअर मार्केट मधून भांडवल उभा करूया त्यावेळी त्यांना शेअर मार्केट मध्ये लिस्ट होणे आवश्यक असते, त्यासाठी काही नियम आहेत, त्यासाठी त्या कंपणीला आपला IPO (इनीशिअल पब्लिक ऑफरिंग) आणावा लागतो. त्या आधारे कंपनी शेअर मार्केट मध्ये पदार्पण करते. त्यानंतर सुरू होतो दुय्यम बाजार म्हणजे खरेदी विक्री याला म्हणतात शेअर मार्केट ट्रेडिंग. आता चालू असलेल्या मार्केट मध्ये अनेक प्रकारे ट्रेडिंग होते ती आपुन पुढे समजून घेऊ या
शेअर मार्केट मध्ये डिमॅट अकाऊंट काय असते ?
आपल्याला Share Market mhanje kay हे समजण्यासाठी त्याविषयी अधिकचे जाणून घ्यावे लागेल जसे की वरती आपण बघितले, आता आपल्या समोर प्रश्न उभा राहतो की हे सर्व करायचे कसे ? ह्या मध्ये ट्रेडिंग कसे करायचे ? त्यासाठी काय काय आवश्यक् आहे. जसे आपल्याला बँकेत व्यवहार करताना बचत अथवा चालू खात्याची गरज असते, तसेच आपण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवण्यासाठी आपल्याला एका विशेष खात्याची ( अकाऊंट ) आवश्यकता असते त्याला डिमॅट खाते म्हणतात. त्या आधारे आपण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत असतो. म्हणजे काय तर ट्रेडिंग साठी आपण डिमॅट खाते उघडले की आपण झालो गुंतवणूकदार.

शेअर मार्केट गुंतवणूकदाराचे प्रकार
ट्रेडिंग करणे म्हणजे गुंतवणूक करणे, Share Market Mhanje Kay हे समजले, आता आपण समजून घेऊया गुंतवणूकदाराचे प्रकार. ट्रेडिंग म्हणजे शेअर खरेदी व विक्री करणे, खरेदी विक्री करू शकतो म्हणजे आपण झालो गुंतवणूदार. आता गुंतवणूकदाराचे सुद्धा प्रकार पडतात जसे की आपण प्रतेक जन हे स्वतंत्र ट्रेडिंग करत असतो म्हणजे आपण झालो किरकोळ गुंतवणूकदार Retail Investors व दूसरा प्रकार म्हणजे संस्थात्मक गुंतवणूकदार Institutional Investors हा प्रकार म्हणजे काही संस्था किंवा कंपनी ह्या एकत्र गुंतवणूक करतात जसे गुंतवणूक कंपनी व म्यूचुअल फंड वैगरे.
ब्रोकर म्हणजे काय
आपण किरकोळ गुंतवणूकदार जे ट्रेडिंग करतो त्यासाठी आपल्याला जे डिमॅट अकाऊंट हवे असते. हे अकाऊंट उघडणे आता खुप सोपे झाले आहे. आता अकाऊंट उघडण्या साठी कुठेही जाण्याची गरज पडत नाही. अकाऊंट हे ऑनलाइन उघडल्या जाते त्यासाठी एक ब्रोकर ( दलाल ) हवा असतो. आता आपल्या कडे खूप प्रसिद्ध ब्रोकर संस्था आहेत. जसे की झिरोदा, एंजेल वन, ग्रो व मोतीलाल ओसवाल वगैरे .
भारतातील शेअर मार्केट
भारतात मुख्यत्वे दोन शेअर मार्केट आहेत, Share Market Mhanje Kay हे समजून घेताना आपल्याल ह्या दोन्ही मार्केटची आपल्याला जनरल माहिती हवी
१ ) BSE बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज
२ ) NSE नॅशनल स्टॉक एक्स्चेंज
BSE चा एक निर्देशांक आहे तो जगभर प्रसिद्ध आहे, हा निर्देशांक सेंसेक्स म्हणुन ओळखला जातो.
Also Read – https://nirmikmarathi.com/new-bajaj-chetak-35-series/
NSE चा हि एक निर्देशांक आहे जो ऑप्शन ट्रेडिंग साठी खुप प्रसिद्ध आहे निफ्टी या नावाने ओळखला जातो.
या दोन्हीही मार्केट मध्ये कंपण्या रजिस्टर असतात. आपल्याला गुंतवणूक अथवा ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी या दोन्हीही मार्केट मध्ये व निर्देशांका मध्ये आपण एकाच डिमॅट अकाऊंट मधून गुंतवणूक करू शकतो.
सेबी म्हणजे काय
आपण केलेली गुंतवणूक सुरक्षित राहावी व गुंतवणुकीवर कुणाची फसवणूक किंवा अन्य काही ज्या समस्या असतात त्यावर नजर ठेवण्यासाठी नियामक प्राधिकरणे (Regulators) असतात जसे SEBI सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, जी भारतातील शेअर बाजार नियंत्रित करते.
डिस्कलेमेर :-
हा लेख फक्त शैक्षणिक उद्धेशाने लिहिलेला आहे, आम्ही या मध्ये कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. कोणतीही गुंतवणूक करते वेळी स्वतः माहिती घ्यावी अथवा आपल्या गुंतवणूक सल्लागारकडून सल्ला घ्यावा
2 thoughts on “Share Market Mhanje kay ? 2025 मध्ये शेअर मार्केट समजुन घेताना”