हिरो मोटर्स ने स्कूटर मार्केटला अतिशय तगडे आवाहन समोर उभे केले आहे, ते Hero XOOM 125 हि एक स्टायलीश स्कूटर सादर करून. नुकत्याच पार पडलेल्या भारत मोबीलिटी एक्सपो 2025 मध्ये सर्वांच्या नजरा ह्या गाडीने वेधून घेतल्या. 14 इंच डाईमंड कट आलोय व्हील व सिकवेनसीयल इंडिकेटेर हे हिचे अप्रतिम वैशिष्ठे असणार आहे.
Hero XOOM 125
एकदम स्टायलीश स्कूटर असलेली Hero XOOM 125 हि लक्ष वेधून घेते ती, हिच्या फालकण म्हणजेच बहिरी ससाणा वरुण घेण्यात आलेल्या लुक मुळे. त्याला अजून जास्त आकर्षक बनवतात ते ह्यामध्ये वापरलेले रंग आणि त्यांची रंगसंगती. एकदा बघितली की आपण ह्या स्कूटर कडे आकर्षित होतोच हा हिचा प्लस पॉइंट म्हणावा लागेल.

Hero XOOM 125 इंजिन
हिरो मोटर्स ने ह्यामध्ये डेस्टिनी 125 मध्ये असलेले त्यांचे टेस्टेड 124.6 cc चे सिंगल सिलेंडर एयर कूलड इंजिन दिले आहे जे Hero XOOM 125 मध्ये 9.92 ps चा पॉवर जेनरेट करते. तसेच 6000 rpm वर 10.4 असा कमाल टोर्क जेनरेट करते. हि स्कूटर पावरफुल तर आहेच परंतु एक स्टाइल स्टेटमेंट बनवते.
वैशिष्ट्ये | तपशील |
---|---|
मायलेज | 124.6 सीसी |
इंजिन प्रकार | एअर कूल्ड, 4 स्ट्रोक, SI इंजिन |
सिलिंडरांची संख्या | 1 |
कमाल पॉवर | 9.92 पीएस @ 7250 आरपीएम |
कमाल टॉर्क | 10.4 एनएम @ 6000 आरपीएम |
फ्रंट ब्रेक | ड्रम |
रिअर ब्रेक | ड्रम |
इंधन टाकी क्षमता | 5 लिटर |
Hero XOOM 125 फीचर्स
हिरो मोटर्स ने Hero XOOM 125 स्कूटर मध्ये भरभरून फिचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे, जसे की LED प्रोजेक्टर हेड लाईट, ऑल LED लाइटनिंग, कोर्नर फ्रंट लाइट, स्मार्टफोन कनेक्टिविटी, ब्लूटूथ कनेक्टिविटी, टर्न-बाय-टर्न नेविगेशन, कॉल/एसएमएस अलर्ट आणि एक्सटर्नल फ्यूल फिलर कॅप सोबत एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर असली तूफान फीचर्स मिळतात. अन्य काही फीचर्स आपण खालील टेबल मध्ये बघु
वैशिष्ट्ये | तपशील |
---|---|
इंस्ट्रुमेंट कन्सोल | डिजिटल |
स्पीडोमीटर | डिजिटल |
ट्रिपमीटर | डिजिटल |
ओडोमीटर | डिजिटल |
सीट प्रकार | सिंगल |
प्रवासी फूटरेस्ट | होय |
कॅरी हुक | होय |
अंडरसीट स्टोरेज | होय |
फ्युएल गेज | डिजिटल |
पास स्विच | होय |
Hero XOOM 125 Dimensions and Capacity
वैशिष्ट्ये | तपशील |
---|---|
रुंदी | 739 मिमी |
लांबी | 1978 मिमी |
उंची | 1131 मिमी |
इंधन टाकी क्षमता | 5 लिटर |
सीटची उंची | 777 मिमी |
Hero XOOM 125 स्पेशल आकर्षण
हिरो मोटर्स ने या मध्ये फ्रंट आणि रीयर मध्ये दोन्ही टायर साइज हि 14 इंच दिली आहे, जी या स्कूटर ला apriliya 125 व यामाहा रे झेड आर 125 ह्या स्कूटर च्या मध्ये स्पर्धक ठरवते. Hero XOOM 125 ला पाठीमाघे 120 mm व पुढे 110 mm हि तगडी टायर साइज दिली आहे. तसेच अतिशय शार्प कर्व हि डिझाईन व उपलब्ध असलेले 4 हि कलर धम्माल आहेत Inferno Red हा सिल्वर ब्लॅक कॉमबीनेशन मध्ये खुप छान दिसतो हे सगळे कलर खुपच सुंदर आहेत. Mat Strom Grey, Metalic Turbo Blue व Matte Neon Lime
Hero XOOM 125 Price
आपण भारतीय लोक कोणतीही गाडी पाहायची म्हंटलो की आपण सर्व प्रथम पाहतो ते त्या गाडीची किंमत, Hero XOOM 125 हि स्कूटर पाहिल्यावर हि शंका अजून वाढते की लोक हिला पाहताच किंमतीचा पहिला विचार करणार. परंतु हिरो मोटर्स ने हिची किंमत हि खुप वाजवी ठेवायच ठरवलेल दिसत. ह्या स्कूटर मध्ये 2 व्हेरियन्ट आहेत VX व ZX ह्या दोन्हीची किंमत हि रु 86,900/- व 92,900/- ex शोरूम आहे.
Hero XOOM 125 Mileage
स्कूटर तर मस्त आहे पण हिचे मायलेज काय हा प्रश्न उपस्थित नाही झाला तर नवलच. तस पाहायला गेलो तर Hero XOOM 125 हि स्कूटर मायलेज साठी बनवली अस वाटत नाही. पण मिडिया रीपोर्ट मध्ये हि स्कूटर 50 ते 55 किमी प्रति लिटर च जबरदस्त मायलेज देते अस दिसून येत आहे.
Hero XOOM 125 Launch Date
Hero XOOM 125 स्कूटर 17 जानेवारी ला भारत मोबईलीटी एक्सपो मध्येच लॉंच करण्यात आली आहे. व बूकिंग हि सुरू आहेत, आपण जवळ च्या शोरूम मध्ये जाऊन बूक करू शकता. ह्या स्कूटर ची डिलेवेरी हि मार्च मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
राम राम मित्रांनो मी Uddhav K. मी गेली काही वर्ष ऑटोमोबाइल व टेक्निकल क्षेत्रा विषयी खुप सखोल माहिती ठेवून असतो. हि सर्व माहिती सरळ सोप्या भाषेत आपल्या पर्यन्त विविध सोशल मिडिया मार्फत पोहोचवत असतो, त्यातील हा एक प्रयत्न…
1 thought on “Hero XOOM 125 एक स्टायलीश स्कूटर”