भारतात दररोज नवनवीन कार येत आहेत, परंतु अश्या परिस्थितीत सर्वसामान्य ग्राहकाची गरज लक्षात घेऊन टाटा मोटर्स नेहमीच बदल करण्यात अग्रणी असते. अशीच गरज लक्षात घेऊन टाटा मोटर्स घेऊन आले आहे India’s First Turbocharged ICNG Tata Nexon जी भारतातील CNG ग्राहकाला एक नवा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. आपण या पोस्ट मधून या भारताच्या पहिल्या टर्बोचार्ज सी एन जी गाडी विषयी.
Tata Nexon CNG
टाटा मोटर्स गेल्या काही वर्षात अतिशय दमदार कामगिरी करत आहे. भारताची पहिली 5 स्टार सेफ्टी रेटिंग असणारी नेक्सॉन हि कार खुपच प्रसिद्ध आहे. लोकांची पसंती हि ह्या गाडीला भरपूर मिळाली, नेक्सोन हि आता पर्यन्त पेट्रोल, डिझेल व इलेक्ट्रिक ह्या प्रकारात मार्केट मध्ये उपलब्ध होती आता हि गाडी India’s First Turbocharged ICNG Tata Nexon उपलब्ध असणार आहे. तेहि टर्बोचार्ज अण सी एन जी ह्या समिकरणा सहित.

Tata Nexon CNG इंजिन आणि परफॉर्मन्स
टाटा मोटर्स ने ह्या गाडी मध्ये त्यांचे प्रसिद्ध असे 1.2L Turbocharged Revotron Engine, 1199 cc, 3-cylinder इंजिन दिले आहे. जे 73.52 kw @5000 rpm पॉवर पीक करते व 170 Nm @2000-3000 rpm टोर्क जेनरेट करते. हे इंजिन अतिशय स्मूद मध्ये cng वर चालते. हे इंजिन डायरेक्ट CNG वर हि स्टार्ट होते.
CNG मध्ये असलेला लॅग ह्या नवीन India’s First Turbocharged ICNG Tata Nexon मध्ये अजिबात जाणवत नाही. आपण एखादी cng गाडी चालवत आहोत हे जाणवणार हि नाही इतके हे इंजिन Cng सोबत ट्यून अप झालेले आहे. टर्बोचार्ज नेक्सॉन चालवणे हा Cng गाड्या मधला बेस्ट अनुभव येत राहतो.
पेट्रोल मोडमध्ये, हेच इंजिन 118 bhp पॉवर आणि समान टॉर्क आउटपुट देते. या गाडीमध्ये बाय-फ्युएल तंत्रज्ञान आहे, त्यामुळे CNG आणि पेट्रोलमध्ये सहज स्विच करता येते. जर CNG संपले, तर गाडी आपोआप पेट्रोल मोडवर जाईल.
Nexon CNG डिझाईन आणि वैशिष्ट्ये
टाटा नेक्सॉन CNG चा डिझाईन हा रेग्युलर नेक्सॉन सारखाच आकर्षक आणि दमदार आहे. India’s First Turbocharged ICNG Tata Nexon असलेली हि गाडी खुपच आकर्षक व देखणी आहे. यामध्ये 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे, जे CNG आणि पेट्रोल दोन्हीचे वेगळे इंधन स्तर दाखवते. 360 कॅमेरा व फ्रंट पार्किंग सेन्सॉर आहे.
नेक्सॉनच्या अन्य वेरियंटप्रमाणेच, या मध्ये वॉइस असिस्ट पॅनरोमिक सनरूप, लेदर सीट, सॉफ्ट टच इंटिरियर, व 6 एयर बॅग व CNG वेरियंटमध्ये देखील सर्व फीचर्स आहेत, त्यामुळे आरामदायी आणि आधुनिक SUV अनुभव मिळतो.
Nexon CNG राइड आणि हँडलिंग
हि नवीन नेक्सॉन India’s First Turbocharged ICNG Tata Nexon गाडीला तीच्या इतर मॉडेल प्रमाणेच उत्तम आहे. टँकच्या अतिरिक्त वजनामुळे गाडीच्या सस्पेन्शनला ट्यून करण्यात आले आहे. त्यामुळे राइड क्वालिटी आणि हँडलिंग उत्तम राहते. पेट्रोल व सी एन जी दोन्ही मध्ये अत्यंत उत्तम अनुभव प्रदान करते
स्टीअरिंग हलक्या गतीसाठी स्मूथ आणि उच्च गतीवर स्टेबल आहे, त्यावरील कंट्रोल खुप सुंदर काम करतात. त्यामुळे ही SUV शहरात आणि महामार्गावरही आरामात चालवता येते. जोडीला एलईडी हेडलंप उत्तम प्रकाश देत राहतो.
टाटा नेक्सॉन CNG स्पेसिफिकेशन्स
वैशिष्ट्ये | तपशील |
---|---|
लांबी * रुंदी * उंची (मिमी) | 3995 * 1804 * 1620 |
व्हीलबेस (मिमी) | 2498 |
ग्राउंड क्लीयरन्स (मिमी) | 208 |
टायर आकार (मिमी) | 195/60 R16 (स्मार्ट & प्युअर पर्सोना) 215/60 R16 (क्रिएटिव & फियरलेस पर्सोना) |
CNG क्षमता (लिटर/किलो) | 60/9 |
इंजिन | 1.2L टर्बोचार्ज्ड रेव्होट्रॉन इंजिन, 1199 cc, 3-सिलेंडर |
पॉवर आउटपुट | 73.52 kw @ 5000 rpm |
टॉर्क | 170 Nm @ 2000-3000 rpm |
सस्पेन्शन (समोर) | इंडिपेंडंट, लोअर विशबोन, मॅकफर्सन स्ट्रट विथ कॉइल स्प्रिंग |
सस्पेन्शन (मागे) | सेमी-इंडिपेंडंट, ओपन प्रोफाइल ट्विस्ट बीम विथ स्टॅबिलायझर बार, कॉइल स्प्रिंग आणि शॉक अॅब्जॉर्बर |
ब्रेक्स | फ्रंट – डिस्क, रियर – ड्रम |
Tata Nexon CNG Mileage
टाटा नेक्सॉन हि गाडी तिच्या दमदार परफॉर्मेंस व उत्तम हॅंडलिंग साठी प्रसिद्ध आहे तसेच मायलेज साठी हि प्रामुख्याने ओळखली जाते, तीच परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न India’s First Turbocharged ICNG Tata Nexon मध्ये केलेला जाणवतो. नेक्सॉन CNG हि ARAI-claimed मायलेज 17.44 km/kg. सांगितले आहे परंतु विविध यू टुब्रर व अन्य सोर्सस ह्या गाडीचे CNG मायलेज हे 25 km/kg असल्याच सांगतात.
Tata Nexon किंमत
टाटा नेक्सॉन CNG ही ₹8.99 लाख ते ₹14.59 लाख (एक्स-शोरूम, भारत) दरम्यान उपलब्ध आहे. हि किंमत India’s First Turbocharged ICNG Tata Nexon SUV साठी आकर्षक असून, ग्राहकांना कमी इंधन खर्चात SUV चालवण्याचा उत्तम पर्याय देते.
राम राम मित्रांनो मी Uddhav K. मी गेली काही वर्ष ऑटोमोबाइल व टेक्निकल क्षेत्रा विषयी खुप सखोल माहिती ठेवून असतो. हि सर्व माहिती सरळ सोप्या भाषेत आपल्या पर्यन्त विविध सोशल मिडिया मार्फत पोहोचवत असतो, त्यातील हा एक प्रयत्न…
1 thought on “India’s First Turbocharged ICNG Tata Nexon”