हे असे एक मशीन आहे जे लहान आणि मध्यम आकाराच्या प्रकल्पांसाठी विशेषतः डिझाइन केले गेले आहे. हे JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” कॉम्पॅक्ट आकाराचे असले तरी त्याची कार्यक्षमता आणि बहु-उपयोगिता यामुळे ते बांधकाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे
बांधकाम आणि शेती क्षेत्रात यंत्रसामग्रीचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. या क्षेत्रात कार्यक्षमता आणि टिकाऊपणा यांना प्राधान्य देणाऱ्या मशीन बनवण्यात JCB ही कंपनी सर्व परिचित आहे. या ब्लॉगमध्ये आपण JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” च्या वैशिष्ट्यांचा, त्याच्या उपयोगांचा आणि त्याच्या फायद्यांचा सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

JCB 2 DX Backhoe Loader
JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” हे एक बॅकहो लोडर आहे, जे बांधकाम आणि खोदकामाच्या कामांसाठी वापरले जाते. हे मशीन एका बाजूला लोडर ( माल उचलण्यासाठी ) आणि दुसऱ्या बाजूला बॅकहो ( खोदकामासाठी ) अशा दोन्ही सुविधांनी सुसज्ज आहे. त्याचा कॉम्पॅक्ट आकार आणि शक्तिशाली इंजिन यामुळे ते अडचणीच्या जागांवरही सहज काम करू शकते.
JCB 2 DX Engine
JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” हे मशीन 49.5 अश्वशक्ती (HP) च्या KOEL 4R810 3.2 लिटर वॉटर-कूल्ड @1400 Rpm 203 Nm टोर्क जेनरेट करते, व हे डिझेल इंजिन जे इंधन कार्यक्षमता आणि शक्ती यांचा योग्य मिश्रण असल्याच दिसून येते. हे इंजिन BSIII उत्सर्जन मानकांचे पालन करते आणि इंधनाची बचत करते, ज्यामुळे ऑपरेटिंग खर्च कमी होतो.
JCB 2 DX Compact Design
JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” चा आकार लहान असल्याने ते अरुंद जागांमध्ये आणि मर्यादित क्षेत्रातही सहज वापरता येते. याची जमिनीपासूनची उंची म्हणजेच (ग्राउंड क्लीयरन्स) चांगली आहे, ज्यामुळे ते खड्ड्यांवरून आणि असमान जमिनीवरही स्थिर चालत राहते. खालील कामे करण्यास हे मशीन बहु उपयोगी आहे.
- रस्ते आणि पूल बांधणी.
- इमारती आणि निवासी प्रकल्प.
- मेट्रो आणि रेल्वे प्रकल्प.
- शेतजमिनीत व , माती व्यवस्थापन.
- जलसंधारण प्रकल्प आणि सिंचन यंत्रणा बसवणे.
- शेतीपूरक कामे आणि गटार खोदणे.
- गटार आणि ड्रेनेज सिस्टिम सुधारणा.
- पाइपलाइन बसवणे आणि भूमिगत केबलिंग.
- नगरपरिषद आणि ग्रामपंचायत कामे.
- लहान खाणींमध्ये खडी, वाळू आणि कोळसा वाहतूक करणे.
- मातीचे उत्खनन आणि लेव्हलिंग करणे.
- पूरग्रस्त भागात अतिशय कमी जागेतील मलबा हटवणे.
- आपत्कालीन बचाव कार्यासाठी मदत.
JCB 2 DX Backhoe Loader Capacity
JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” लोडर च्या बकेटचा आकार 0.6 घनमीटर (cu.m) डम्प अॅंगल 44′ व 800 किलो पे लोड. बॅकहो च्या बकेटचा आकार 0.18 घनमीटर (cu.m) खोदण्याची कमाल खोली 3.02 मीटर, लोडरची डंप उंची 2.2 मीटर. मशीनचे संपूर्ण वजन 5220 किलो आहे.
JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” लोडर आर्म मजबूत असून त्याला उच्च ब्रेकआउट फोर्स आणि उचलण्याची क्षमता आहे. JCB च्या उत्पादन प्रक्रियेत F.E.A. (Finite Element Analysis) आणि स्ट्रेन गेजिंगचा वापर केला जातो, ज्यामुळे मशीन ची गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढते. व मशीन अधिक ग्राहकाच्या उपयोगी बनते आहे.
JCB 2 DX Backhoe Attachment
JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” विविध अटॅचमेंट्ससह येऊ शकते, जसे की हाय डंप बकेट, 6-इन-1 बकेट, ऑगर आणि डोझर ब्लेड, ज्यामुळे त्याची उपयोगिता वाढते. तसेच ते बहु उपयोगी ठरते.
JCB 2 DX Mileage
JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” हे मशीन ताशी फक्त 3 ते 4 लिटर इंधन वापरते, ज्यामुळे ते गुंतवणुकीसाठी एक किफायतशीर पर्याय ठरते व अधिकचे उत्पन्न मिळण्यासाठी हि खूपच फायदेशीर आहे.
JCB 2DX
वैशिष्ट्य | तपशील |
---|---|
इंजिन शक्ती | 49.5 HP (36.4 kW) |
इंधन वापर | 4 लिटर/तास |
लोडर बकेट आकार | 0.6 घनमीटर |
बॅकहो बकेट आकार | 0.18 घनमीटर |
कमाल खणण्याची खोली | 3.02 मीटर |
डंप उंची | 2.2 मीटर |
टॉर्क | 203 Nm @ 1400 RPM |
सेवा अंतर | 500 तास |
JCB 2DX बॅकहो लोडरची वैशिष्ट्ये आणि फायदे
1. पॉवरफुल इंजिन आणि कार्यक्षमता
- JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” मध्ये शक्तिशाली आणि इंधन कार्यक्षम इंजिन बसवलेले आहे, जे कमी इंधनात जास्त काम करण्यास मदत करते.
- JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” इंजिन क्षमता 49 एचपी (हॉर्सपॉवर) असून, हे कमी देखभाल खर्चात चांगली कार्यक्षमता देते.
- दीर्घकाळ चालणारे आणि टिकाऊ इंजिन जे कोणत्याही हवामानात उत्तम कामगिरी देते.
2. कॉम्पॅक्ट आणि अष्टपैलू डिझाइन
- JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” हे लहान आणि अरुंद जागेत सहज हालचाल करू शकते, ज्यामुळे शहरी आणि गावातील बांधकाम प्रकल्पांसाठी योग्य आहे.
- याची रचना मजबूत असून, उंच-नीच भागातही सहज काम करू शकते.
- इतर मोठ्या मशीनच्या तुलनेत हलके वजन असल्याने वाहतूक करणे सोपे होते.
3. दुहेरी कार्यक्षमतेसह यंत्रणा (लोडर आणि बॅकहो)
- फ्रंट लोडर: माती, वाळू, खडी, सिमेंट आणि इतर वस्तू सहज उचलण्यास आणि वाहतूक करण्यास मदत करते.
- बॅकहो: खोदकाम करण्यासाठी अत्यंत प्रभावी, विशेषतः पाइपलाइन बसवणे, गटार खोदणे आणि शेतीपूरक कामांसाठी उपयुक्त.
- JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” हे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारची कामे (लोडिंग आणि एक्स्कॅव्हेटिंग) करण्याची क्षमता.
4. ऑपरेटरसाठी सुलभ आणि आरामदायक डिझाइन
- JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” मध्ये ऑपरेटरसाठी आरामदायक आणि सुरक्षित केबिन, ज्यामुळे लांब वेळ काम करताना कमी थकवा जाणवतो.
- उत्तम दृष्टीकोन आणि कंट्रोल्समुळे सहज ऑपरेशन करता येते.
- कमी आवाज आणि कमी कंपनामुळे अधिक आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव.
5. इंधन कार्यक्षम आणि कमी देखभाल खर्च
- JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” हे कमी इंधन वापर आणि उच्च मायलेज, ज्यामुळे दीर्घकाळ काम करताना खर्च कमी येतो.
- मजबूत बांधणीमुळे कमी मेंटेनन्स लागतं आणि कामाच्या वेळेत व्यत्यय येत नाही.
- JCB ची अधिकृत सर्व्हिस नेटवर्क भारतभर उपलब्ध असल्यामुळे दुरुस्ती आणि सुटे भाग सहज उपलब्ध होतात.
6. सुरक्षितता आणि टिकाऊपणा
- JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” हे मजबूत चेसिस आणि फ्रेम जे कोणत्याही कठीण परिस्थितीत कामगिरी देतात.
- ऑपरेटरच्या सुरक्षिततेसाठी मजबूत ROPS/FOPS केबिन.
- JCB ची उत्कृष्ट गुणवत्ता आणि विश्वासार्हता यामुळे दीर्घकाळ टिकणारे वाहन.
JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” Price
JCB 2 DX Backhoe Loader “Chota JCB” ची किंमत त्याच्या वैशिष्ट्यांनुसार बदलते, साधारणतः ₹20 ते ₹25 लाख पर्यंत असते. काही प्रमुख फायनान्स कंपन्या आणि बँका JCB साठी कर्ज आणि EMI पर्याय देतात, त्यामुळे लहान व्यावसायिक आणि शेतकरी याला सहज खरेदी करू शकतात.
Read Also 👇
Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर
राम राम मित्रांनो मी Uddhav K. मी गेली काही वर्ष ऑटोमोबाइल व टेक्निकल क्षेत्रा विषयी खुप सखोल माहिती ठेवून असतो. हि सर्व माहिती सरळ सोप्या भाषेत आपल्या पर्यन्त विविध सोशल मिडिया मार्फत पोहोचवत असतो, त्यातील हा एक प्रयत्न…
Надежный сантехник СПб – прайс с фиксированными расценками
вызов сантехника на дом стоимость услуги https://santeh1-montazh-price.ru/ .
Уютная атмосфера вашего заведения – подберите идеальную мебель для кафе
мебель для бара купить https://mebel-dlya-kafe.ru .
Сертифицированная технологическая карта на погрузочно-разгрузочные работы для вашего бизнеса
типовая технологическая карта проведение погрузочно разгрузочных работ с применением автопогрузчика https://tekhnologicheskie-karty.ru/ .