Mahindra BE 6 Born Ev

महिंद्रा मोटर्सने BE (Born Electric) ह्या मालिकेत नवीन इलेक्ट्रिक SUV, Mahindra BE 6 Born Ev सादर केली आहे. अत्याधुनिक डिझाइन, अतिशय प्रगत तंत्रज्ञान आणि तितकाच दमदार परफॉर्मन्ससह ही SUV भविष्यातील Born Electric चे प्रतीक ठरणार आहे हे नक्की.

Mahindra BE 6

भारतीय बाजारात गेल्या काही वर्षात अनेक इलेक्ट्रिक कार सादर झाल्या व उत्तम प्रदर्शन हि करत आहेत, त्यातील जवळपास सर्व ह्या ice च्या मॉडेल वर डेव्हलप केल्या गेलेल्या इलेक्ट्रिक कार आहेत. परंतु महिंद्रा मोटर्सने सादर केलेली हि कार Mahindra BE 6 Born Ev आहे. महिंद्रा च्या INGLO ह्या त्यांच्या ELECTRIC ORIGIN ARCHITECTURE वर बनवण्यात आली आहे.

Mahindra BE 6 Born Ev
Mahindra BE 6 Born Ev Image Credit Mahindra
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Artificial Intelligence In Mahindra BE 6

महिंद्रा मोटर्सने ह्या Mahindra BE 6 Born Ev मध्ये MAIA हे त्यांनी इन हाऊस डिझाईन केलेले MAHINDRA ARTIFICIAL INTELLIGENCE ARCHITECTURE वापरुन एक इंटेलिजेन्ट कार बनवली आहे.

Mahindra BE 6 Born Ev मध्ये Advanced Neural Engine हे 51 ट्रिलीयन ऑपरेशन पर सेकंड करते त्यामुळे हि कार ADAS लेवल 2 च्या माध्यमातून चालकाला अतिरिक्त सुरक्षा व सहयोग प्रदान करते.

Mahindra BE 6 Born Ev ह्या कार मध्ये Advanced Neural Engine दिले आहे, ज्या मध्ये अडवांस 5 g कणेक्टीवीटी अडवांस 6 Wi Fi व Qualcomm Snapdragon 8295 – fastest chipset in automotive grade हे प्रोसेसर देण्यात आले आहे, जे 24 GB RAM, 128 GB storage, and an ultra-fast 6th generation Adreno GPU सहाय्याने अतिशय स्मूद वर्क करते.

Mahindra BE 6 Born Ev हि खऱ्या अर्थाने एक ARTIFICIAL INTELLIGENCE कार ठरते ती वरच्या वैशिस्ठे मुळे, ह्या कार मध्ये ADAS लेवल 2 हे भारतीय रस्तयानच्या सोयीने ट्यून केले आहे, जसे की प्राणी, रस्त्याने चालणारे लोक, वेगवेगळी वाहने, वेगवेगळी बॅरिकेट्स व आतरंगी रस्ते हि सहज पार करू शकेल.

Mahindra BE 6 तांत्रिक तपशील आणि वैशिष्ट्ये
वैशिष्ट्यमाहिती
रेंज557 – 683 किमी
पॉवर228 – 282 bhp
बॅटरी क्षमता59 – 79 kWh
DC चार्जिंग वेळ20 मिनिटे (140 kW DC)
AC चार्जिंग वेळ6 / 8.7 तास (11.2 kW / 7.2 kW चार्जर)
बूट स्पेस455 लिटर

Mahindra BE 6 Design And Features

Mahindra BE 6 Born Ev ही एक आकर्षक आणि फ्युचरिस्टिक डिझाईन केलेली इलेक्ट्रिक SUV आहे. तीच्या मध्ये अत्यंत आधुनिक एरोडायनामिक डिझाइन वापरले आहे, LED लाइटिंग सिग्नेचर आणि कॅरेक्टरिस्टिक BE ग्रिल डिझाईन ह्या कार ला खूपच देखणे बनवतात. ह्या गाडीचा स्पोर्टी आणि डायनॅमिक लुक तिला इतर SUV पेक्षा वेगळी ओळख प्रदान करतो आहे.

Mahindra BE 6 Born Ev च्या इंटीरियरमध्ये मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि प्रीमियम अपहोल्स्ट्री दिली आहे. हिचा कॉकपिट रेसिंग टाइप डिझाईन केला आहे. महिंद्राने ह्या गाडीचे इंटीरियर डिझाइन पर्यावरणपूरक मटेरियल वापरून केले आहे, ज्यामुळे ही गाडी अधिक टिकाऊ आणि इको-फ्रेंडली बनली आहे.

Mahindra BE 6 Born Ev मध्ये डॉल्बी आटोमोस सिस्टम हि 16 स्पीकर सह प्रसिद्ध अशी Harman Kardon ची दिलेली आहे, तसेच डायनामीक वर्कस्पेस व एंटरटेंमेंट हब 69 अॅप सह येते ज्यामुळे हि कार एंटरटेंमेंट चा फुल्ल पॅकेज असल्याच दिसून येते.

Battery Range And Performance

महिंद्राने ह्या कार साठी नवीनतम इलेक्ट्रिक पॉवरट्रेन तंत्रज्ञान विकसित केले आहे. Mahindra BE 6 Born Ev मध्ये दोन बॅटरी LPF पॅक येतात 59 kWh व 79 kWh ते अनुक्रमे 557 किमी व 683 किमी MIDC रेंज देते अस महिंद्रा तर्फे सांगितले जात आहे. ही SUV लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी देखील उत्तम पर्याय ठरू शकते. तसेच, हि कार फास्ट चार्जिंग क्षमता केवळ 20 मिनिटांत 80% चार्ज हि 175 kW चार्जर वर होते.

ह्या इलेक्ट्रिक कार ची पॉवरट्रेन हि रियरव्हील ड्राइव मोटर 170 kW व 210 kW मध्ये येते, जी 380 NM चा टोर्क जेनरेट करते जो सर्वोत्तम आहे. ज्या मुळे तत्काळ टॉर्क मिळतो व आणि जबरदस्त एक्सेलेरेशनमुळे Mahindra BE 6 Born Ev शहरात तसेच हायवेवर उत्कृष्ट परफॉर्मन्स देते. यात मल्टीपल ड्रायव्हिंग मोड्स असून, यामुळे गाडीचा वेग आणि बॅटरीचा योग्य वापर नियंत्रित करता येतो व रिजेनरेशन हि उत्कृष्ठ मिळते.

Mahindra BE 6 Technology and Safety

सुरक्षिततेच्या बाबतीत Mahindra BE 6 Born Ev मध्ये 5-स्टार NCAP रेटिंग मिळवण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात येत आहे. यात ABS, EBD, ट्रॅक्शन कंट्रोल, आणि मल्टीपल एअरबॅग्स यांसारखी अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

तसेच Mahindra BE 6 Born Ev मध्ये लेवल 2 ADAS मध्ये 5 रडार व 12 अल्ट्रासोनिक सेन्सर व 360 विव्ह सुपर कॅमेरा सेट अप दिला आहे, Eye Dentity Sensor आहे जे चालकाच्या अलर्ट वर नजर ठेवते व झोप लागते वेळी अलर्ट करते.

बहुतेक वेळी गाडी पार्क करते वेळी खुप समस्या येतात अश्यावेळी ह्या कार ल ऑटोपार्क हि दिला आहे जो वापरुन हि Mahindra BE 6 Born Ev स्वत पार्किंग मध्ये जागा शोधून स्वत; पार्क होते.

हि Mahindra BE 6 Born Ev ऑटोनॉमस ड्रायव्हिंग मोड्स – भविष्यातील स्वायत्त ड्रायव्हिंगसाठी तयार करण्यात आली आहे.

Mahindra BE 6 Specifications

Mahindra BE 6 Born Ev हि कार अतिशय प्रशस्थ आहे, ड्रायवर व को पॅसेंजर सीट हे 6 वे पॉवर अॅडजस्ट आहेत. 7 एयर बॅग आहेत, बूट स्टोरेज 455 लिटर व फ्रँक स्टोरेज 45 लिटर च आहे.

Mahindra BE 6 Born Ev मध्ये इन्फिनिटी रूफ हे आंबियन्ट लाइट सह फुल्ल ग्लास आहे, तसेच पूर्ण लेदर् सीट हे वेनटिलेटेड आहेत.

Mahindra BE 6 Born Ev चा ग्राऊंड क्लियरन्स् हा 207 mm चा आहे, जो भारतीय रस्त्या साठी खुपच योग्य आहे. ह्या कार ला 18 इंच स्टील व्हील19 इंच अल्लॉय व्हील हे ऑप्शन दिले आहे.

Mahindra BE 6 Price

महिंद्राची मजबूत ब्रँड व्हॅल्यू आणि भारतीय बाजारपेठेसाठी समर्पित फीचर्समुळे Mahindra BE 6 Born Ev एक आकर्षक पर्याय बनून उभी राहत आहे. Mahindra BE 6 Born Ev ची बेस मॉडेल हे 18.90 लाख रु पासून सुरू होते तर टॉप मॉडेल हे 26.90 लाख रु एक्स शोरूम आहे.

Mahindra BE 6 Home And Fast Charging

Mahindra BE 6 Born Ev हि कार फास्ट चार्जिंग क्षमता केवळ 20 मिनिटांत 80% चार्ज हि 175 kW चार्जर वर होते. परंतु घरच्यासाठी हिच्या सोबत 11 kWh व 7.2 kWh असे 2 चार्जर येतात जे अनुक्रमे 59 kW ला 6 व 8.7 तासात तर 79 kW ला 8 व 11.7 तासात फुल्ल चार्ज करतात.

Mahindra BE 6 Benefits of Nature

Mahindra BE 6 Born Ev पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्याने शून्य कार्बन उत्सर्जन करते. त्यामुळे ही SUV केवळ खर्चिकदृष्ट्या फायदेशीर नाही तर पर्यावरणासाठीही अनुकूल आहे. याशिवाय, महिंद्राने ह्या कार मध्ये सस्टेनेबल मटेरियल आणि रिसायकलिंग तंत्रज्ञानावर भर दिला आहे.

Read Also 👇

TATA Tiago 2025 Budget EV Car

Mahindra BE 6 Born Ev ही एक अत्याधुनिक, पर्यावरणपूरक आणि प्रीमियम इलेक्ट्रिक SUV आहे. उत्कृष्ट रेंज, जबरदस्त तंत्रज्ञान, आणि दमदार सुरक्षिततेसह ही SUV भारतीय बाजारात नवीन मानक प्रस्थापित करेल.

Leave a Comment