रेपो रेट म्हणजे काय ? दैनंदिन जीवनावर काय परिणाम करतो

रेपो रेट हा एक शब्द आपल्याला महिना दोन महीने झाले की कानावर पडतो किंवा बऱ्याचदा ऐकतो, तेव्हा मनात हा प्रश्न उपस्थित होतो कि रेपो रेट म्हणजे काय ? विशेषत: जेव्हा बँकिंग, अर्थव्यवस्था किंवा कर्जाच्या व्याजदरांबद्दल माध्यमांवर चर्चा होते. पण मग रेपो रेट म्हणजे नेमके काय ? आणि ते आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम करते ? मग चला तर आपण जाणून घेऊया रेपो रेटची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत…

Table of Contents

रेपो रेट म्हणजे काय ?

रेपो रेट म्हणजे काय ? तर तो व्याजदर ज्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( RBI ) हि देशातील व्यावसायिक बँकांना अल्पकालीन कर्ज देते. “रेपो” हा शब्द “रिपर्चेस ऑप्शन” या वरून आला आहे. याचा अर्थ असा की, बँकांनी RBI कडून घेतलेले कर्ज ठरलेल्या कालावधीनंतर परत करावे लागते आणि त्यावर व्याज म्हणून रेपो रेट आकारला जातो.

 रेपो रेट म्हणजे काय ?
रेपो रेट म्हणजे काय ?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

रेपो रेट म्हणजे काय ? सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर जेव्हा बँकांना तात्पुरत्या काळासाठी रोख रकमेची गरज असते, तेव्हा त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतात. हे कर्ज सरकारी रोखे/बॉन्ड गहाण ठेवून घेतले जाते आणि त्यावर जो व्याजदर लागतो, तोच रेपो रेट असतो.

उदाहरण जर द्यायचे तर, जर रेपो रेट 6% असेल, तर बँकांना RBI कडून घेतलेल्या प्रत्येक 100 रुपयांवर 6 रुपये व्याज द्यावे लागते.

रेपो रेट कसे काम करते ?

रेपो रेट म्हणजे काय ? हे समजल तर प्रश्न उभा राहतो की हा काम कसे करतो, तर रेपो रेट हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चा एक महत्त्वाच हत्यार आहे, ज्याचा वापर देशातील अर्थव्यवस्था नियंत्रित करण्यासाठी केला जातो. तो कसा काम करतो हे समजून घेण्यासाठी आपण त्याची प्रक्रिया हि खालील पॉइंट च्या आधारे समजून घेता येईल.

बँकांना कर्ज देणे

रेपो रेट म्हणजे काय ? तर रेपो रेट हा तो व्याजदर आहे, ज्या व्याजदराणे RBI व्यावसायिक बँकांना ( जसे की SBI, HDFC, ICICI ) अल्पकालीन कर्ज देते. जेव्हा बँकांना पैशांची गरज भासते, तेव्हा त्या RBI कडून हे कर्ज घेतात. या कर्जाच्या बदल्यात बँका त्यांच्याकडील सरकारी सिक्युरिटीज जसे की बॉन्ड व कर्जरोखे रिजर्व बँक ऑफ इंडिया RBI कडे गहाण ठेवतात.

रिपर्चेस करार

रेपो रेट म्हणजे काय ? हे समजून घेताना “रेपो” म्हणजे काय त्याचा अर्थ काय होतो ? हे समजून घ्याव लागेल, तर ” रेपो म्हणजे रिपर्चेस ऑप्शन “. म्हणजेच, बँकांना ठरलेल्या कालावधीनंतर (सामान्यत: 1 दिवस ते 14 दिवस) हे कर्ज परत करावे लागते आणि गहाण ठेवलेल्या सिक्युरिटीज परत घ्याव्या लागतात. या कर्जावर RBI जो व्याजदर आकारते, त्याला रेपो रेट म्हणतात.

पैशांच्या पुरवठ्यावर नियंत्रण

रेपो रेट म्हणजे काय ? समजून घेतले परंतु रेपो रेट आधारे रिझर्व बँक ऑफ इंडिया हि एक प्रकारे देशातील चलनावर नियंत्रण ठेवत असते ते कसे हे समजून घेऊ…

रेपो रेट वाढला तर

थोडक्यात जर RBI ने रेपो रेट वाढवला (उदा. 6% वरून 7%), तर बँकांना कर्ज घेणे महाग पडते. परिणामी, बँका कमी कर्ज घेतात, बाजारात पैशांचा पुरवठा कमी होतो आणि महागाई नियंत्रणात येते.

रेपो रेट कमी झाला तर

जर रेपो रेट कमी झाला (उदा. 6% वरून 5%), तर बँकांना स्वस्तात कर्ज मिळते. यामुळे बँका जास्त कर्ज घेतात, बाजारात पैशांचा पुरवठा वाढतो आणि आर्थिक वाढीला चालना मिळते.

बँकांचे व्याजदर आणि ग्राहकांवर परिणाम

रेपो रेट म्हणजे काय ? व त्याचा सर्वसाधारण ग्राहकावर अथवा व्यक्ती वर काय परिणाम होतो, तर RBI कडून मिळणाऱ्या कर्जाच्या खर्चाचा थेट परिणाम बँकांच्या व्याजदरांवर होतो. रेपो रेट कमी असेल तर बँका गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा व्यवसाय कर्ज स्वस्तात देतात. उलट, रेपो रेट जास्त असेल तर कर्जाचे व्याजदर वाढतात आणि EMI महाग होतो.

रेपो रेट म्हणजे काय ? अण त्याचा आपल्याला काय फायदा व तोटा याचे उदाहरण दयाचे झाल्यास, समजा रेपो रेट 5% आहे. एखादी बँक RBI कडून 100 कोटी रुपये कर्ज घेते. तिला 1 वर्षानंतर 105 कोटी रुपये परत करावे लागतील (मूळ रक्कम + 5% व्याज). जर रेपो रेट 7% झाला, तर तिला 107 कोटी रुपये परत करावे लागतील. हा खर्च बँका ग्राहकांच्या वर टाकतात. परिणामी ग्राहकाचा खर्च वाढतो.

थोडक्यात रेपो रेट म्हणजे काय ? तर हे एक साधन आहे ज्याद्वारे RBI बाजारातील पैशांचा प्रवाह, महागाई आणि आर्थिक विकास यांचा समतोल राखन्याचा प्रयत्न करत असते. तो वाढवला किंवा कमी केला जाणे हे देशाच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. थोडक्यात, रेपो रेट अर्थव्यवस्थेचा “नियंत्रक” म्हणून काम करतो.

RBI ला रेपो रेट का वापरावा लागतो ?

रेपो रेट म्हणजे काय ? तो का वापरावा लागतो तर रेपो रेट हे RBI चं महत्वाचं आर्थिक साधन आहे. त्याद्वारे RBI खालील गोष्टी नियंत्रित करते.

  • महागाई ( Inflation )
  • बँकिंग व्यवस्थेतील तरलता ( Liquidity )
  • अर्थव्यवस्थेतील गती/वाढ ( Growth )

महागाईवर नियंत्रण

देशात जेव्हा महागाई वाढते, तेव्हा RBI रेपो रेट वाढवते. त्यामुळे बँकांसाठी कर्ज घेणं महाग होतं, आणि परिणामी कर्जवाटप कमी होतं. यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा कमी होतो आणि महागाई थोडी स्थिर होते.

वाढीला चालना देणे

देशाची अर्थव्यवस्था मंदावली असेल, तर RBI रेपो रेट कमी करते, ज्यामुळे बँकांना स्वस्तात निधी मिळतो. हे बँका पुढे ग्राहकांना स्वस्त दराने कर्ज देऊ शकतात, ज्यामुळे उद्योग-व्यवसाय, गृहनिर्माण यासारख्या क्षेत्रांना चालना मिळते.

तरलतेचे व्यवस्थापन

रेपो रेट बदलून RBI बँकिंग व्यवस्थेत आवश्यक त्या प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध करून देऊ शकते.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय ?

रेपो रेट म्हणजे काय ? हे समजून घेताना आणखी एक शब्द नेहमी कानावर पडतो तो म्हणजे रिव्हर्स रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय ? तो कसा काम करतो हे थोडक्यात जाणून घेऊ …

रिव्हर्स रेपो रेट हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या धोरणातील एक महत्त्वाचा भाग आहे. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे तो व्याजदर जो RBI व्यावसायिक बँकांना त्यांचे अतिरिक्त पैसे RBI कडे ठेवल्याबद्दल देते. सोप्या शब्दांत, जेव्हा बँकांकडे जास्त पैसे असतात आणि ते RBI कडे ठेवतात, तेव्हा RBI त्यावर व्याज देते, आणि हा व्याजदर म्हणजे रिव्हर्स रेपो रेट.

रिव्हर्स रेपो रेट कसे काम करतो ?

  • जेव्हा बँकांकडे ग्राहकांना कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी वापरता येणार नाहीत असे जास्त पैसे असतात, तेव्हा त्या बँका ते पैसे RBI कडे सुरक्षित ठेवतात.
  • या ठेवींवर RBI बँकांना व्याज देते, ज्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.
  • हा दर सामान्यत: रेपो रेटपेक्षा कमी असतो.

रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट यामधील फरक

घटकरेपो रेटरिव्हर्स रेपो रेट
कोण कर्ज घेतंबँका RBI कडूनRBI बँकांकडून (बँका RBI कडे पैसे ठेवतात)
उद्दिष्टबँकांना निधी पुरवणेबँकांकडील अतिरिक्त निधी शोषून घेणे
व्याजदरजास्ततुलनेत कमी

रेपो रेटचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो

रेपो रेट म्हणजे काय ? तर रेपो रेट फक्त बँकांपुरता मर्यादित नसून, त्याचे थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम सर्वसामान्य माणसावर होत असतात ते खालील पॉइंट आधारे समजून घेऊ

कर्जाच्या व्याजदरावर परिणाम

रेपो रेट वाढल्यास बँकांचे कर्ज घेण्याचा खर्च वाढतो. त्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज, व्यवसायिक कर्ज यांचे हप्ते वाढतात. उलट रेपो रेट कमी झाल्यास हे कर्ज स्वस्त होते. त्यामुळे हा आपल्या दैनंदिन जीवनावर खुप परिणांमकारक असतो.

मुदत ठेवी आणि बचतीवर परिणाम

रेपो रेट वाढल्यास बँका जास्त व्याजदराने ठेवी स्वीकारतात, त्यामुळे FD (Fixed Deposit) सारख्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक वाढते.

रेपो रेट कमी झाल्यास शेअर बाजाराला चालना मिळते कारण गुंतवणूकदार अधिक नफा मिळवण्याच्या शोधात असतात. वाढ झाल्यास बाजार थोडा संकोचतो.

महागाईवर परिणाम

रेपो रेट वाढवून RBI पैशाचा पुरवठा कमी करते, त्यामुळे RBI ला महागाईवर नियंत्रण ठेवता येते.

जगभरातील रेपो रेटच्या समतुल्य संज्ञा

देशकेंद्रीय बँकरेपो/समान दर
भारतरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)रेपो रेट
अमेरिकाफेडरल रिझर्व्ह (Federal Reserve)फेडरल फंड्स रेट (Federal Funds Rate)
युनायटेड किंगडमबँक ऑफ इंग्लंडबँक रेट
युरोझोनयुरोपियन सेंट्रल बँक (ECB)मुख्य पुनर्वित्तीकरण दर (Main Refinancing Rate)

रेपो रेटमध्ये RBI बदल कधी करते ?

रेपो रेट म्हणजे काय ? हे समजून घेतल्यानंतर प्रश्न उपस्थित होतो, रेपो रेट कोण ठरवतो ? आपल्या देशात रिझर्व बँक ऑफ इंडिया, RBI ची “मॉनेटरी पॉलिसी कमिटी (MPC)” असते, हि MPC कमिटी दर दोन महिन्यांनी (वर्षातून ६ वेळा) बैठक घेते आणि देश्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार रेपो रेटमध्ये बदल करते. तो ठरवताना काही घटक विचारात घेतले जातात जसे कि,

  • महागाईचा दर ( CPI, WPI )
  • GDP वाढीचा दर.
  • जागतिक परिस्थिती ( क्रूड तेल, डॉलर इ. चे दर )
  • सरकारचे खर्च धोरण ठरवणे.
  • चलन विनिमय दर निश्चिती.

कोविड काळातील रेपो रेटमधील बदल

रेपो रेट म्हणजे काय ? त्याचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो ती रेपो रेट आधारे कशी नियंत्रित करता येते याच उदाहरण म्हणजे कोविड काळ. कोविड-१९ काळात अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. RBI ने परिस्थिती हाताळण्यासाठी रेपो रेट ५.१५% वरून थेट ४.००% पर्यंत खाली आणला. हे पाऊल आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी होते.

यामुळे कर्ज स्वस्त झाली, बँकांकडे पैसा वाढला, गुंतवणूक वाढली, बाजार स्थिर राहिला, व सामान्य लोक कोविड 19 सारख्या भयंकर परिस्थिती मध्ये हि स्थिर झाले.

थोडक्यात रेपो रेट म्हणजे काय ? तर…

रेपो रेट म्हणजे RBI कडून बँकांना दिल्या जाणाऱ्या अल्पकालीन कर्जावरील व्याजदर.

रेपो रेट चा उपयोग महागाई नियंत्रण, आर्थिक गती वाढवणे, आणि बँकिंग तरलतेचे व्यवस्थापन यासाठी होतो.

रेपो रेट वाढल्यास कर्ज महाग होते, FD व्याजदर वाढतो, बाजार थोडा सावध होतो.

रेपो रेट कमी झाल्यास कर्ज स्वस्त होते, महागाई वाढू शकते.

रेपो रेट मुळे सामान्य माणसासाठी कर्जाचे EMI, गुंतवणुकीचे पर्याय, आणि महागाई यावर याचा परिणाम होतो.

रेपो रेट म्हणजे काय ? तर हा एक आर्थिक सूचक आहे जो आपल्या घरगुती अर्थसंकल्पापासून ते देशाच्या आर्थिक धोरणापर्यंत सगळीकडे प्रभाव टाकत असतो. तो कळला, की आपल्याला कर्ज, बचत, गुंतवणूक यावर योग्य निर्णय घेणे सोपे होते.

रेपो रेट हा केवळ आर्थिक जगतातील संज्ञा नसून तो आपल्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेला आहे, म्हणूनच त्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. व प्रत्येकाने याचा अभ्यास ठेवायला हवा.

प्रिय वाचकहो तुम्हाला हा लेख आवडला का ? यासंबंधी प्रश्न, शंका किंवा सुचना असतील, तर खाली कॉमेंट करून नक्की कळवा.

1 thought on “रेपो रेट म्हणजे काय ? दैनंदिन जीवनावर काय परिणाम करतो”

Leave a Comment