Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment

रॉयल एनफील्डने त्यांच्या स्क्रॅम्बलर श्रेणीतील नवीन मॉडेल Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment भारतीय बाजारात सादर केले आहे. हे मॉडेल त्यांच्या पूर्वीच्या स्क्रॅम 411 चे अपग्रेडेड व्हर्जन असून, यामध्ये अनेक सुधारणा आणि नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. जसे की नवीन 6 स्पीड गियर बॉक्स व नवीन पावरफुल्ल इंजिन. चला तर जाणून घेऊया Scram 440 विषयी.

Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment
Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment Image Credit Royal Enfield
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Scram 440 डिझाइन आणि वैशिष्ट्ये

रॉयल एनफील्ड हा ब्रॅंड ओळखला जातो तो त्यांच्या धाकड मोटरसायकल साठी. त्यांची प्रत्येक मोटरसायकल हि वेगळी ओळख ठेवून असते, व प्रत्येक भारतीय तरुणाचे एक स्वप्न असते की आपल्या जवळ एक रॉयल एनफील्ड असावी. अशीच एक धाकड 187 किलो वजन असलेली मोटरसायकल Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment सादर झाली.

Scram 440 ह्या मोटरसायकलचे डिझाइन स्क्रॅम 411 प्रमाणेच आहे, परंतु यात काही नवीन बदल करण्यात आले आहेत. जसे… ✅ रोबस्ट आणि अॅडव्हेंचर-रेडी डिझाइन, जे ऑफ-रोडिंगसाठी उत्तम आहेत.
✅ नवीन एलईडी हेडलाइट आणि एलईडी टेललाइट, ज्यामुळे रात्री अधिक चांगली दृश्यमानता मिळते.
डिजिटल-एनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, जे स्पीडोमीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर, फ्यूल इंडिकेटर आणि गिअर पोझिशन दर्शवते त्यामुळे ऑफ रोडिंग मध्ये खुप मदत होते.
USB चार्जिंग पोर्ट, जे राइडिंगदरम्यान फोन चार्ज करण्यासाठी उपयुक्त आहे. लांब प्रवासात ह्याचा फायदा होतो.

Scram 440 इंजिन आणि परफॉर्मन्स

स्क्रॅम 440 मध्ये रॉयल एनफील्ड ने अतिशय योग्य अश्या सुधारणा करून नवीन 443 cc सिंगल-सिलिंडर लॉन्ग स्ट्रोक एअर- व ऑइल कूल्ड इंजिन दिले आहे, जे 25.4 बीएचपी हि 6,250 आरपीएम वर आणि 34 एनएम टॉर्क हा 4,000 आरपीएम वर निर्माण करते.

Scram 440 मुख्य वैशिष्ट्ये

वैशिष्ट्यमाहिती
इंजिन क्षमता443 cc
गिअरबॉक्स6-स्पीड मॅन्युअल
कर्ब वेट (वजन)196 kg
इंधन टाकी क्षमता15 लिटर
सीट उंची795 mm
कमाल पॉवर25.4 bhp

तसेच Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment ला नवीन 6-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे ज्यामुळे हायवेवर कमी आरपीएमवर चालविता येते, ज्यामुळे कमी व्हायब्रेशन होते. फ्यूल इंजेक्शन (FI) तंत्रज्ञान दिले आहे ज्यामुळे जास्त मायलेज आणि चांगला परफॉर्मन्स आणि चांगली इंधन कार्यक्षमता म्हणजे मायलेज हि मिळते.

Scram 440 सस्पेंशन आणि ब्रेकिंग

Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment ला समोर 41mm टेलिस्कोपिक फोर्क्स (190mm ट्रॅव्हल) आणि मागे मोनोशॉक (180mm ट्रॅव्हल ) सस्पेंशन दिले आहे, ज्यामुळे राइडरला विविध रस्त्यांवर आरामदायक राइडिंगचा अनुभव मिळतो. या मॉडेल मध्ये ब्रेकिंगसाठी समोर 300mm डिस्क ब्रेक आणि मागे 240mm डिस्क ब्रेक सह ड्युअल-चॅनेल स्विचेबल एबीएस दिले आहे, ज्यामुळे राइडरला ऑफ रोडिंग साठी आवश्यकतेनुसार मागील चाकाचे एबीएस बंद करण्याची सुविधा मिळते.

Scram 440 व्हेरिएंट्स आणि रंग

Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment हि मोटरसायकल दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. 1) ट्रेल आणि 2) फोर्स. हि दोन्ही हि मॉडेल आकर्षक आहे.

  1. ट्रेल ;- व्हेरिएंटमध्ये स्पोक व्हील्स आणि दोन रंग पर्याया मध्ये उपलब्ध आहे, ब्लू आणि ग्रीन या मध्ये आकर्षक ग्राफिक्स वापरले आहे व रंग संगती हि आकर्षक आहे.
  2. फोर्स ;- व्हेरिएंटमध्ये अलॉय व्हील्स आणि तीन रंग पर्याया मध्ये उपलब्ध आहे ब्लू, ग्रे, आणि टील उपलब्ध आहेत. या मध्ये सुद्धा आकर्षक ग्राफिक्स वापरले आहे व रंग संगती हि आकर्षक आहे. या व्हेरिएंटमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन पॉड देखील समाविष्ट आहे. या मध्ये फूल Google मॅप नॅव्हिगेशन हा दिला आहे.

Scram 440 टायर आणि ग्राउंड क्लीअरन्स

Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment या मोटरसायकल मध्ये समोर ट्रेल व्हेरिएंटमध्ये 19-इंच स्पोक व्हील व 100/90/19 सेक्शन टायर तर मागे 17-इंच टायर स्पोक व्हील ला 120/80/17 सेक्शन 17-इंच टायर आहेत.

फोर्स व्हेरिएंटमध्ये 19-इंच अलॉय व्हील्स व 100/90/19 सेक्शन टायर तर मागे 17-इंच टायर अलॉय व्हील्स ला 120/80/17 सेक्शन 17-इंच टायर आहेत, जे ट्रॅक्शन सुधारतात.

तसेच या मॉडेल ला बेस्ट इन् सेगमेन्ट 190mm ग्राउंड क्लीअरन्स दिला आहे, जो खराब रस्त्यांवर बाईकला सहज सांभाळन्यास मदत करतो व हॅंडलिंग सोपी होते.

Scram 440 मायलेज

या Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment मध्ये रॉयल एनफील्ड ने 19 लिटर क्षमते ची फ्युल टॅंक दिली आहे, व ARAI सर्टिफिएड मायलेज 30 Kmpl सांगितल्या जाते. ज्यानुसार हि बाइक 400 किलोमीटर अंतर फूल टॅंक मध्ये जाते.

Scram 440 किंमत

आता आपल्यासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो किंमतीचा की या स्टायलीश Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment ची किंमत आहे तरी काय. तर ट्रेल व्हेरिएंट: ₹2.08 लाख (एक्स-शोरूम) फोर्स व्हेरिएंट: ₹2.15 लाख (एक्स-शोरूम) आहेत.

Scram 440 निर्माता वॉरंटी

वॉरंटी प्रकारमाहिती
स्टँडर्ड वॉरंटी3 वर्षे
किलोमीटर वॉरंटी30,000 किमी

Scram 440 ची मार्केट स्पर्धा

रॉयल एनफील्ड हा ब्रॅंड तस पाहायला गेल तर कुणाशी स्पर्धा करायला जात नाही, परंतु या Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment ची मीडिया रीपोर्ट नुसार Yezdi Scrambler, Honda CB350RS, KTM 390 Adventure X या प्रसिद्ध मोटरसायकल सोबत स्पर्धा सांगितली जाते आहे.

Scram 440 थोडक्यात

Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment हि मोटरसायकल ऑफ-रोडिंग आणि अॅडव्हेंचर लव्हर्ससाठी एक उत्तम पर्याय आहे. नवीन इंजिन, उत्कृष्ट सस्पेंशन आणि ब्रेकिंग सिस्टममुळे ही मोटरसायकल ऑफ-रोड आणि ऑन-रोड दोन्ही प्रकारच्या राइडिंगसाठी योग्य आहे. जर तुम्ही दमदार, स्टायलिश आणि विश्वासार्ह स्क्रॅम्बलर मोटरसायकल शोधत असाल, तर स्क्रॅम 440 तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरू शकते.

1 thought on “Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment”

Leave a Comment