महाराष्ट्र RTE Admission 2025-26
केंद्र व राज्य सरकार द्वारा देण्यात येणाऱ्या 25% राइट टु एज्युकेशन, म्हणजे शिक्षणाचा हक्क कायदा अंतर्गत प्रत्येक मोठ्या व लहान शाळेला 25% प्रवेश हे आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलांसाठी राखीव असते, हि प्रक्रिया दरवर्षी शासना कडून एप्रिल मे मध्ये चालू करण्यात येत होती ती या वर्षी डिसेंबर मध्येच चालू करण्यात आली आहे. या लेखात आम्ही या प्रवेश प्रक्रिया विषयी असलेल्या शंका, RTE 2025-26 Admission Last Date व अटी नियम विषयी सविस्तर जाणून घेऊया.
RTE Maharashtra 2025-26 ची शेवटची तारीख काय
महाराष्ट्र शासन तर्फे शाळांचे व्हेरिफिकेशन 18 डिसेंबर 2024 रोजी सुरू करण्यात आले होते त्याची पडताळणी झाल्यानंतर 14 जानेवारी ला नोटिफिकेशन देण्यात आले, त्यानुसार 14 जानेवारी 2025 ला ऑनलाइन अर्ज स्विकारणे सुरू करण्यात आले आहे. ज्याची RTE 2025-26 Admission Last Date हि 27 जानेवारी 2025 हि आहे. त्याचे शेड्यूल पुढील प्रमाणे.
प्रवेश माहिती
तपशील | तारीख |
---|---|
प्रवेश परिपत्रक | 14 जानेवारी 2025 |
प्रवेश ऑनलाइन सुरू | 14 जानेवारी 2025 |
शेवटची तारीख | 27 जानेवारी 2025 |
रिजल्ट लॉटरी | जून 2025 |
फायनल राऊंड | जून 2025 |
अॅडमिशन सुरू | ऑगस्ट 2025 |
RTE Age Limit For Admission 2025-26
RTE प्रवेशासाठी वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. 19 जानेवारी 2023 च्या महाराष्ट्र शासन GR नुसार RTE 2025-26 Admission Last Date हि 27 जानेवारी आहे, त्यासाठी खालील टेबल 👇 प्रमाणे वयोमर्यादा निश्चित केले आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसाची शिथिलता देण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे.
बालकांचे वय माहिती
प्रवेशाचा वर्ग | वयोमर्यादा (1 जुलै ते 31 डिसेंबर) | दि. 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय | दि. 31 डिसेंबर 2023 रोजी कमाल वय |
---|---|---|---|
प्ले ग्रुप / नर्सरी | 1 जुलै 2021 – 31 डिसेंबर 2025 | 3 वर्षे | 4 वर्षे 5 महिने 30 दिवस |
ज्युनियर केजी | 1 जुलै 2020 – 31 डिसेंबर 2025 | 4 वर्षे | 5 वर्षे 5 महिने 30 दिवस |
सीनियर केजी | 1 जुलै 2019 – 31 डिसेंबर 2025 | 5 वर्षे | 6 वर्षे 5 महिने 30 दिवस |
इयत्ता 1 ली | 1 जुलै 2018 – 31 डिसेंबर 2025 | 6 वर्षे | 7 वर्षे 5 महिने 30 दिवस |

महाराष्ट्र RTE Admission 2025-26 नियम व सूचना
RTE प्रवेश प्रक्रिया RTE 2025-26 Admission Last Date नियम व सूचना ह्या खालील प्रमाणे पाहूया.
1) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2025-2026 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
3) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही !
4) १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.
5) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
8) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
10) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
11) RTE २५ % प्रवेश 2025-2026 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27/01/2025 पर्यंत राहील.
12) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
13) सन 2025-2026 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
14) सन 2025-2026 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
15) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google map वर पत्ता टाकून ते lattitude , longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
महाराष्ट्र RTE Admission 2025-26 आवश्यक कागदपत्रे
RTE 2025-26 Admission Last Date 25 % ऑनलाइन प्रवेशा करिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकाांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूवीची असावीत. त्यानांतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
2) बालकाचे आधार कार्ड, रहिवाशी पुरावा आणि जन्म तारखेचा पुरावा ही कागदपत्रे प्रवेश पात्र सर्व
बालकाकरिता आवश्यक आहेत.
आणखी सविस्तर कागदपत्रांसाठी इथे 👉 क्लिक प्रवेशकरीता आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्र RTE Admission 2025-26 फॉर्म कसा भरावा
RTE 2025-26 Admission Last Date व सर्व माहिती हि RTE Maharastra पोर्टल वर उपलब्ध आहे. आपण या पूर्वी शासनाचे काही योजनेचे फॉर्म स्वतः भरले असतील तर अनुभवावरून तुम्ही हा फॉर्म ऑनलाइन हि भरू शकता तो भरण्यासाठी इथे क्लिक करा 👉 RTE Online Form
महाराष्ट्र RTE Admission 2025-26 चे फायदे
RTE 2025-26 Admission Last Date साठी हा लेख आपण लिहिला आहे परंतु RTE चे फायदे काय आहेत हे जाणून घेणे हि महत्वाचे आहे RTE कायद्यामुळे 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध होते. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील मुलांना खाजगी शाळांमध्ये प्रवेशाची संधी मिळते. खाजगी शाळांमध्ये 25% जागा दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी राखीव आहेत. शिक्षण क्षेत्रातील असमानता कमी होते. शाळांमध्ये जात, धर्म, लिंग, भाषा किंवा आर्थिक स्थिती यावर आधारित कोणताही भेदभाव होऊ नये याची खात्री केली जाते. सर्वांसाठी समान शिक्षणाची संधी मिळते. दिव्यांग मुलांसाठी विशेष उपाययोजना आणि सुविधांचा समावेश असतो.
Read Also 👇
रेशीम शेती साठी 75% अनुदान, रेशीम उद्योग पोकरा अंतर्गत माहिती व प्रक्रिया
राम राम मित्रांनो मी Uddhav K. मी गेली काही वर्ष ऑटोमोबाइल व टेक्निकल क्षेत्रा विषयी खुप सखोल माहिती ठेवून असतो. हि सर्व माहिती सरळ सोप्या भाषेत आपल्या पर्यन्त विविध सोशल मिडिया मार्फत पोहोचवत असतो, त्यातील हा एक प्रयत्न…