भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर लक्षणीयरित्या वाढत आहे, विशेष करुन स्कूटर सेगमेन्ट मध्ये ओला मुळे तर खुपच स्पर्धा वाढल्याचे दिसून येत आहे, परंतु आत्ता ‘ओला ला विसरा येतेय नवीन Ultraviolette Tesseract’
अश्यातच आपल्या नावीन्यपूर्ण उत्पादनासाठी प्रसिद्ध होत असलेल्या Ultraviolette या कंपनी ने त्यांचे क्रांतिकारी असे अत्यंत आधुनिक अश्या Ultraviolette Tesseract ला भारतीय बाजारात सादर केले आहे.
- 👉 फ्रंट आणि रियर रडार्स
- 👉 ड्युअल चॅनेल ABS ब्रेकिंग सिस्टम
- 👉 Omnisense मिरर्स
- 👉 ⚡ फास्ट चार्जिंग – केवळ 60 मिनिटांत 80% चार्ज
- 👉 360° Advanced Rider Assistance System (ARAS)

Ultraviolette Tesseract आकर्षक डिझाईन
Ultraviolette Tesseract चे डिझाइन हे लढाऊ हेलिकॉप्टर पासून प्रेरित आहे, ज्यामुळे ती आकर्षक आणि आक्रमक दिसते. या स्कूटरमध्ये ड्युअल एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, फ्लोटिंग डीआरएल्स आणि 7-इंचाचा टीएफटी टचस्क्रीन डिस्प्ले आहे, जो नेव्हिगेशन आणि राइड ॲनालिटिक्स सारख्या सुविधा प्रदान करतो. याशिवाय, 34 लिटरची अंडरसीट स्टोरेज ही एका फुल-फेस हेल्मेटला सामावून घेण्यास पुरेशी आहे.
🔹 ड्युअल LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि फ्लोटिंग DRLs
🔹 शार्प साइड पॅनेल्स आणि स्पोर्टी बॉडीवर्क
🔹 मजबूत अॅल्युमिनियम चेसिस आणि हलके फाइबर पॅनेल्स
ओला ला विसरा येतेय नवीन Ultraviolette Tesseract ची हि डिझाइन वैशिष्ठे केवळ स्टायलिश नाही, तर हवा प्रतिरोध कमी करून अधिक रेंज आणि रायडिंग स्थिरता देखील मिळवून देते.
Ultraviolette Tesseract पॉवरफूल परफॉर्मेंस
Ultraviolette Tesseract हि स्कूटर 15kW PMSM इलेक्ट्रिक मोटर सह येते, जी 125 km/h पर्यंत टॉप स्पीड वर जाऊ शकते. तसेच या स्कूटर मध्ये 20.1 bhp (15 kW) ची शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर आहे जी अवघ्या 2.9 सेकंदात 0 ते 60 km/h स्पीड गाठण्याची क्षमता आहे. त्यामुळे शहरातील प्रवास तसेच लांबच्या रस्त्यावरही दमदार कामगिरी करते.
👉 0 ते 60 km/h फक्त 2.9 सेकंदांत .
👉 0 ते 100 km/h फक्त 6 सेकंदांत .
Ultraviolette Tesseract बॅटरी आणि रेंज
Ultraviolette Tesseract हि तीन SRB 6 ह्या प्रकारच्या बॅटरी पर्यायांसह उपलब्ध होणार आहे, तसेच सर्व बॅटरी प्रकारात 8 वर्षांच्या वॉरंटी हि 2 लाख किलोमीटर सह असणार आहे, जे की सेगमेन्ट फर्स्ट अस वैशिष्ठे म्हणता येईल.
🔋 3.5 kWh बॅटरी – 162 किमी IDC रेंज .
🔋 5 kWh बॅटरी – 220 किमी IDC रेंज .
🔋 6 kWh बॅटरी – 261 किमी IDC रेंज .
Ultraviolette Tesseract हि फास्ट चार्जर वापरल्यास ही स्कूटर 0 ते 80% चार्ज होण्यासाठी एक तासापेक्षा कमी वेळ घेते, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ती सोयीस्कर ठरणार आहे.
⚡ फास्ट चार्जिंग – केवळ 60 मिनिटांत 80% चार्ज .
⚡ ड्युअल चार्जिंग पोर्ट – होम चार्जिंग आणि पब्लिक चार्जिंग स्टेशन्ससाठी सपोर्ट.
AI बेस्ड रायडिंग मोड
Ultraviolette Tesseract ही केवळ इलेक्ट्रिक स्कूटर नसून, ती भविष्यातील वाहतुकीचा एक आदर्श पर्याय असणार आहे, ह्या मध्ये आर्टिफिश्यल इंटेलेजेनट चा वापर करुन रायडिंग मोड देण्यात आले आहे.
🎯 इको मोड – अधिक मायलेजसाठी
🏎️ स्पोर्ट्स मोड – वेगवान आणि उत्साही राइडिंगसाठी
🚀 हाय परफॉर्मन्स मोड – हायवे आणि ट्रॅक राइडिंगसाठी
Ultraviolette Tesseract सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ठे
Ultraviolette Tesseract हि केवळ वेग आणि रेंजपुरती मर्यादित नाही, तर सुरक्षिततेसाठीही डिझाईन करण्यात आली ती आहे. यामध्ये ड्युअल-चॅनल ABS व ट्रॅक्शन कंट्रोल, आणि डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल यांसारख्या सुविधा आहेत. याशिवाय, यामधील एआय तंत्रज्ञानामुळे स्कूटरची स्थिती, राइड स्टॅट्स आणि सुरक्षितता अलर्ट्स रिअल-टाइम मध्ये मिळतात.
👉 फ्रंट आणि रियर रडार्स – आजूबाजूच्या वाहतुकीची सतत माहिती देतात.
👉 Omnisense मिरर्स – ब्लाइंड स्पॉट आणि वेगाने येणाऱ्या वाहनांची सूचना देतात.
👉 ड्युअल चॅनेल ABS ब्रेकिंग – घसरण किंवा अचानक ब्रेकिंग टाळते.
👉 हिल होल्ड असिस्ट – चढावावर स्कूटर मागे सरकू नये म्हणून मदत करते. 👉 रडार-आधारित ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) 👉 ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज असिस्ट आणि कोलिजन वॉर्निंग.
Ultraviolette Tesseract स्मार्ट आणि आधुनिक तंत्रज्ञान
Ultraviolette Tesseract या स्कूटरमध्ये अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत, मुख्य म्हणजे 7-इंचाचा TFT टचस्क्रीन डिस्प्ले आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांसह येते.

📍 GPS नेव्हिगेशन – अचूक रस्ता शोधण्यास मार्गदर्शन करते.
📹 स्मार्ट डॅशकॅम – सुरक्षेसाठी राइड रेकॉर्डिंग करतो, सेगमेन्ट फर्स्ट असे वैशिष्ट्ये म्हणता येईल.
🔑 कीलेस एक्सेस – स्कूटर लॉक/अनलॉक करण्यासाठी फिजिकल कीची गरज नाही.
🅿️ पार्क असिस्ट – अरुंद जागेत पार्किंग करण्यास सोपे करते.
📲 मोबाईल अॅप कनेक्टिव्हिटी – रियल-टाइम बॅटरी आणि सुरक्षा अलर्ट्स व विविध अपडेट मोबाइल वर मिळत राहतात.
स्टोरेज आणि कम्फर्ट
Ultraviolette Tesseract ही स्कूटर 34 लिटरच्या अंडर-सीट स्टोरेज सह येते, जे एका फुल-फेस हेल्मेटसह इतर आवश्यक वस्तू ठेवण्यासाठी पुरेसे आहे.
🛵 वायरलेस मोबईल चार्जर – फ्रंट ग्लो बॉक्स मध्ये वायरलेस चार्जिंग तसेच टाइप शी पोर्ट हि देण्यात आला आहे.
🪑 प्रीमियम स्प्लिट सीट डिझाईन – अधिक आरामदायी प्रवासासाठी उत्तम आहे.
🚦 स्मार्ट पार्किंग असिस्ट – अरुंद जागेत स्कूटर पार्किंग सुलभ करण्यास मदत करते.
Ultraviolette Tesseract vs इतर स्कूटर्स
वैशिष्ट्य | Ultraviolette Tesseract | Ola S1 Pro | Ather 450X |
---|---|---|---|
टॉप स्पीड | 125 km/h | 116 km/h | 100 km/h |
रेंज | 261 किमी | 181 किमी | 150 किमी |
मोटर पॉवर | 15kW | 11kW | 6.2kW |
0-60 km/h वेळ | 2.9 सेकंद | 3.6 सेकंद | 3.9 सेकंद |
अंडरसीट स्टोरेज | 34 लिटर | 36 लिटर | 22 लिटर |
चार्जिंग वेळ | 60 मिनिटांत 80% | 75 मिनिटांत 80% | 90 मिनिटांत 80% |
Ultraviolette Tesseract कलर पर्याय
Ultraviolette Tesseract हि चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होणार असल्याचे Ultraviolette ने जाहीर केले आहे ते रंगसंगती नुसार अतिशय आकर्षक दिसतात, ते पुढील प्रमाणे आहेत.
👉 डेझर्ट सँड, 👉 सोनिक पिंक, 👉 सोलर व्हाइट . 👉 स्टेल्थ ब्लॅक.
किंमत आणि लॉंच
Ultraviolette Tesseract हि Ultraviolette Automotive या बेंगळुरू स्थित कंपनीने मार्च 2025 मध्ये भारतीय बाजारात लाँच केली. ही स्कूटर भारतीय बाजारपेठेत प्रीमियम स्कूटर सेगमेन्ट मध्ये नवीन मानदंड स्थापित करनार आहे.
Ultraviolette Tesseract या स्कूटरची किंमत पहिल्या 50,000 ग्राहकांसाठी 1.20 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे, तर त्यानंतर ती 1.45 लाख रुपये पर्यंत जाईल. ही स्कूटर तीन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध आहे – 3.5 kWh, 5 kWh आणि 6 kWh, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवड करता येते.
👉 बुकिंग सुरू – ₹999 मध्ये ऑनलाइन किंवा डीलरशिपवर सुरू झाली आहे.
👉 डिलिव्हरी – 2026 च्या पहिल्या तिमाहीत डिलेवेरी केल्या जाणार आहेत, हि थोडीसी निराशा करणारी बाब असणार आहेत कारण खुप जास्त वेळ हे घेत आहेत
का घ्यावी
भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वेगाने वाढत आहे आणि Ultraviolette Tesseract EV scooter ही त्याचाच एक उत्कृष्ट पर्याय राहणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, वेगवान परफॉर्मन्स, प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटी यामुळे ही स्कूटर बाजारात क्रांती घडवण्यास सज्ज झाली आहे. प्रतीक्षा आहे टी हिच्या रोडवर दिसण्याची. का घ्यावी Ultraviolette Tesseract EV scooter
👉 125 km/h टॉप स्पीड आणि जबरदस्त परफॉर्मन्स
👉 261 किमी रेंज – लांबच्या प्रवासासाठी योग्य
👉 AI-बेस्ड रायडिंग मोड्स आणि स्मार्ट TFT डिस्प्ले
👉 ड्युअल चॅनेल ABS आणि 360° सुरक्षा प्रणाली
👉 34 लिटर स्टोरेज आणि आरामदायी रायडिंग अनुभव
जर तुम्हाला स्टायलिश, पॉवरफुल आणि फ्युचरिस्टिक EV स्कूटर हवी असेल, तर Ultraviolette Tesseract हा OLA व Ather नंतर सर्वोत्तम पर्याय असणार आहे.
तुम्हाला ही स्कूटर कशी वाटली ? तुम्ही EV स्कूटर घेतल्यास कोणता पर्याय निवडणार व का ? कमेंटमध्ये तुमचे विचार जरूर सांगा.
राम राम मित्रांनो मी Uddhav K. मी गेली काही वर्ष ऑटोमोबाइल व टेक्निकल क्षेत्रा विषयी खुप सखोल माहिती ठेवून असतो. हि सर्व माहिती सरळ सोप्या भाषेत आपल्या पर्यन्त विविध सोशल मिडिया मार्फत पोहोचवत असतो, त्यातील हा एक प्रयत्न…